वरुण धवनच्या बर्थ-डेनिमित्त चाहत्यांना सरप्राइज; 'बेबी जॉन'चं हटके पोस्टर आऊट
Varun Dhawan esakal
Premier

Varun Dhawan: वरुण धवनच्या बर्थ-डेनिमित्त चाहत्यांना सरप्राइज; 'बेबी जॉन'चं हटके पोस्टर आऊट

priyanka kulkarni

Varun Dhawan: हटके भूमिका आणि सिनेमांसाठी चर्चेत असलेला अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आता नव्या भूमिकेतून आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काहीच दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आगामी बेबी जॉन या आगामी सिनेमाची घोषणा केली होती आणि आज म्हणजे 24 एप्रिल 2024 ला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाच्या टीमने सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या आधी सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते आणि आता हे तिसरं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

चिखलात हात मारणारलेला, केस आणि दाढी वाढवलेले असा वरुणचा लूक या पोस्टरवर पहायला मिळत असून त्याच्या चेहऱ्यावर खूप रागीट भाव पाहायला मिळत आहेत. या पोस्टरला "बेबी जॉन सिनेमामागची ताकद असलेल्या वरुणला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अविस्मरणीय सिनेमा अनुभवण्यासाठी तयार राहा." असं कॅप्शन देत वरूणला वाढदिवसाच्या शुभेच्छा सिनेमाच्या टीमने दिल्या. अनेकांनी या पोस्टरवर कमेंट करत वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हा सिनेमा पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत असं म्हंटलं.

पहा पोस्टर:

३१ मे २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा साऊथ इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीचा गाजलेला सिनेमा थेरीच्या कथेवर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कालिस करत असून सिनेमाची निर्मिती स्वतः अॅटली, त्याची पत्नी प्रिया, ज्योती देशपांडे, मुराद खेतानी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. कीर्ती सुरेश या सिनेमात वरुणसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. थेरी या सिनेमात साऊथ सुपरस्टार विजयची मुख्य भूमिका होती. सीबीआयची मदत करणाऱ्या एका स्पायची भूमिका यात विजयने साकारली होती आणि आता या सिनेमाची कथाही तशीच असेल का? असा प्रश्न या सिनेमात चाहत्यांना पडला आहे.

याशिवाय वरुण हॉलिवूडच्या गाजलेल्या 'सिटाडेल' या गाजलेल्या वेबसिरीजचा पूर्वार्ध असलेल्या वेबसिरीजमध्ये दिसणार असून 'सिटाडेल हनी बनी' असं या वेबसिरीजचं नाव आहे. राज आणि डीके ही जोडी या सिरिजचं दिग्दर्शन करतेय. या सिरीजमध्ये तो समांथासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ही एक स्पाय वेबसिरीज असून या वेबसिरीजच्या अमेरिकन व्हर्जनमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने काम केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी, 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

Ajit Pawar: दादाचा वादा! राजकारणात आल्यापासून कधीही पक्ष बदलला नाही; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला महत्त्वाचा संदेश; Video

Team India Arrival Live Updates : आले रे आले... अजिंक्यवीर आले! टीम इंडियाच्या शेड्यूलमध्ये थोडा ट्विस्ट; PM मोदींना भेटण्याचे ठिकाण बदलले

Benefits Of Vrikshasana : मानसिक अन् शारिरीक संतुलन राखण्यासाठी वृक्षासन उपयुक्त, जाणून घ्या सरावाची पद्धत आणि फायदे

SCROLL FOR NEXT