विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट शुक्रवारी १९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आनंद तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा कॉमेडी ड्रामा सिनेमा खऱ्या घटनांवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'गुड न्यूज'चा हा सिक्वेल आहे, पण ही कथा पूर्णपणे नवीन, वेगळी आणि अनोखी आहे. हेट्रोपॅटर्नल सुपरफेकंडेशनभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना आवडली का? प्रेक्षकांची सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे वाचा कसा आहे चित्रपट.
'बॅड न्यूज' या चित्रपटात सलोनी बग्गा म्हणजेच तृप्ती डिमरी अखिल चड्ढा (विकी कौशल) आणि गुरबीर पन्नू (एमी विर्क) या दोन पुरुषांसोबत असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि ती गर्भवती आहे. जेव्हा डॉक्टर तिला जुळी होणार असल्याचं सांगतात. हेट्रोपॅटर्नल सुपरफेकंडेशन ही एक दुर्मिळ घटना आहे ज्यामध्ये दोन्ही मुलांचे दोन वडील आहेत. इथेही असंच घडलं आहे. अशा परिस्थितीत अखिल आणि गुरबीर यांच्यात मतभेद होतो, कधी हा चित्रपट हसवतोय तर कधी रडवतो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे की नाही हे जाणून घेऊया.
एका युझरने ट्वीटरवर लिहिलं, 'बॅड न्यूज हा सरासरी चित्रपट आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी चांगला प्रयत्न केला आहे, पण कॉमेडी फार चांगली नाही. विकी कौशलचं असणं ही चित्रपटाची चांगली गोष्ट आहे. आणखी एकाने लिहिलं, 'हा चित्रपट खूप मजेशीर होता. विनोद, कथा, सगळंच छान आहे. विक्की कौशलने नेहमीप्रमाणे जादू केलीये आणि तृप्ती डिमरीही खूप चांगली आहे. चुकवू नका.नक्की पाहा.'
एका युझरने लिहिलं, 'जे काही दाखवलं ते ट्रेलरमध्ये होतं. कॉमेडी चांगली आहे. काही विनोद ठीक होते, काही नीट बसले नाहीत. सर्व कलाकारांचा अभिनय छान आहे. विकी चांगला होता आणि यावेळी सरदारचे पात्र मूर्खासारखे दाखवण्यात आलेले नाही.' दुसऱ्या युझरने लिहिलं, '#BadNews चा क्लायमॅक्स हृदयस्पर्शी आहे. दुर्दैवाने, काही विनोद नीट चालले नाहीत. उत्तरार्धात दोन्ही हिरोच्या वागण्याने प्रेक्षक चिडून जातात. पण चित्रपट तसा चांगला आहे.'
'बॅड न्यूज' चित्रपटाची निर्मिती ॲमेझॉन प्राइम, धर्मा प्रॉडक्शन आणि लिओ मीडिया कलेक्टिव्ह यांनी केली आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी सकाळपर्यंत ३८,५९४ तिकिटे बुक झाली होती. म्हणजेच चित्रपटाने 1.08 कोटींची कमाई केली. माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी 5 ते 7 कोटींचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.