Bhuvan Bam Esakal
Premier

Bhuvan Bam : वडिलांची व्यसनाधीनता आणि घरातील भांडणं ; सुरुवातीच्या काळातील स्ट्रगलवर व्यक्त झाला प्रसिद्ध युट्युबर ,"ते मला ओळखत.."

सकाळ डिजिटल टीम

Bhuvan Bam Interview : 'बीबी कि वाईन्स' या युट्युब चॅनेलवरील भन्नाट कॉमेडी स्किट्समुळे भुवन बम अल्पावधीतच घराघरात पोहोचला. सेल्फी कॅमेऱ्याने शूट करून सगळ्या भूमिका एकट्याने साकारत तो सादर करत असलेले कॉमेडी स्किट्स सोशल मीडियावर चांगलेच हिट झाले. या घडीला भुवनचे सोशल मीडियावर २६.४ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. तर आता भुवन अभिनयक्षेत्रातही नशीब आजमावतो आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भुवनने त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाविषयी भाष्य केलं.

वी आर युवा या युट्युब चॅनेलच्या 'बी अ मॅन यार' या शोमध्ये भुवनने हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या घरातील वातावरण, त्यांच्या अडचणी आणि त्याला करावा लागलेला स्ट्रगल यावर भाष्य केलं. यावेळी त्याने त्याचा वडिलांचं दारूचं व्यसन, त्यांना झालेला आजार यावरही तो व्यक्त झाला.

भुवन या मुलाखतीत म्हणाला कि,"मी आठवीत, नववीत असताना माझ्या लक्षात यायला लागलं कि माझे वडील रोज दारू पितात. रोज संध्याकाळी सहा नंतर ते दारू प्यायचे. लहान असल्यामुळे मी सुरुवातीला कधीच त्यांना याबद्दल काही बोललो नाही. एकदा ते झोपल्यावर मी बाटलीच्या झाकणात दारू ओतून पिऊनही बघितलं आणि त्यानंतर माझा घसा भाजला. त्यानंतर मी ठरवलं कि या गोष्टीला कधीच हात लावायचा नाही. आमच्याकडे यावरून रोज भांडणंही व्हायची. सुरुवातीला मी आणि माझा भाऊ यात पडायचो नाही पण जसे आम्ही मोठे झालो तस आम्ही वडिलांना यावरून बोलायला लागलो. "

पुढे तो म्हणाला कि,"त्यांचं व्यसन खूप वाढलं होतं. एक काळ असा होता कि बीबी कि वाईन्स हे माझं चॅनेल सुपरहिट झालं होतं. माझ्या घराच्या बाहेर लोकांची गर्दी असायची आणि घरात भांडण सुरु असायची. कित्येकदा घरात वाद सुरु असताना मी माझे कॉमेडी व्हिडीओ बनवले आहेत. कधी कधी मी घराबाहेर जायचो, सगळ्या फॅन्सना भेटून सेल्फी काढायचो. म्हणजे ते निघून गेले कि घरातील वाद मला थांबवता येईल. तर कधी कधी मी वडिलांना समजावायचो कि मला व्हिडीओ बनवायचा आहे दोन तास शांत राहा मी तुम्हाला दारू आणून देतो."

यानंतर त्याने वडिलांच्या आजारपणावरही भाष्य केलं. तो म्हणाला,"त्यांचं दारू पिणं कधीच थांबलं नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं कि, आम्ही त्यांना कधीच रोखायचं नाही. त्यामुळे आम्ही रोखू शकत नव्हतो. त्यांच्या दारूच्या व्यसनाचा हा परिणाम झाला कि त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांचं मेंदूच ऑपरेशन झालं आणि त्यांच्या डोक्याच्या एका बाजूची कवटी काढून टाकण्यात आली. त्यानंतर ते जवळपास दोन वर्षं ते मला ओळखत नव्हते. त्यांना माझं नाव माहित होत, त्यांना भुवन आणि अमन नावाची दोन मुलं आहेत हे लक्षात होतं पण ते सगळे आम्हीच आहोत हे त्यांच्या लक्षात नव्हतं. मग दोन वर्षांनी ते बरे झाले. त्यानंतर कोरोनामुळे आम्ही त्यांना गमावलं. "

बीबी कि वाईन्स यामुळे प्रसिद्ध झालेल्या भुवनने आतापर्यंत ढिंढोरा, ताजा खबर, रफ्ता रफ्ता या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. त्याची ताजा खबर ही वेबसिरीज खूप गाजली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT