'बिग बॉस मराठी ५' नंतर ताबडतोब बिग बॉस १८ सुरू होणार आहे, ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस १८ चा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. यावेळेस सलमान खान त्याच्या घराचा ताबा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा सलमान छोट्या पडद्यावर पार्टनर आहे. यावेळेसच्या स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. आता बिग बॉस १८ च्या घरातले काही फोटो समोर आले आहेत जे पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्यात. मेकर्सकडून बिग बॉस १८ च्या घरातला एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात बिग बॉस १८ चं घर नेमकं कसं असणार आहे हे दिसतंय. यावेळेसची थीम अगदीच हटके आहे.
नेहमीप्रमाणेच यावेळीही 'बिग बॉस'च्या घराचं इंटीरियर खूपच वेगळं ठेवण्यात आलं आहे. यावेळी शोची थीम प्राचीन सभ्यतेशी जोडली गेली आहे म्हणजेच प्राचीन थीम ठेवण्यात आली आहे. प्रत्येक बाजूची भिंत ही मातीच्या घराप्रमाणे दिसतेय. निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये घरातील प्रत्येक कोपरा दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये असं म्हटलं जात आहे की, 'या घरात एकही घड्याळ नाही आणि वेळही कळणार नाही. पण तुमची वेळ प्रत्येक क्षणाला कशी बदलते हे बिग बॉस तुम्हाला सांगेल कारण बिग बॉस सुरू होणार आहे. गार्डन परिसराचा प्रत्येक कोपरा नवीन कथा लिहिणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे भविष्य येथील प्रत्येक आरशात स्पष्टपणे दिसेल. कुटुंबातील एखादा सदस्य जेव्हा येथे वावरतो तेव्हा हे आलिशान घर काळाबरोबर त्याचा रंग बदलेल.'
पुढे सांगितले जात आहे की, 'येथील प्रत्येक रस्ता कुटुंबातील सदस्यांची वेळ बदलू शकतो आणि राहत्या जागेत एकत्र येण्याचा आदेश ऐकल्यानंतर त्यांची वेळ देखील थांबू शकते. बिग बॉसच्या इच्छेनुसार किचमध्ये रेशनही येईल. आणि इथली भांडीही त्यांच्या इच्छेनुसार बोलतील. स्वप्नांवरही वेळेचे बंधन असेल. या रिॲलिटी शोचा प्रीमियर ६ ऑक्टोबरला रात्री होणार आहे. त्याच्या प्रीमियरसाठी शूटिंग पूर्ण झाले आहे. या शोच्या सेटवरून काही झलक समोर आली आहेत. आता चाहते हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.