Premier

Bigg Boss Marathi Season 5 : भांडणाच्या नादात स्पर्धकांनी केले बाळांचेच हाल , भावनाशून्य सदस्यांना बिग बॉस करणार शिक्षा ?

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन पाच चा खेळ चांगलाच रंगला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांनी घरात धुमाकूळ घातला. घरात दोन पाहुणे आले होते. ह्या दोन छोट्या बाळांना सांभाळण्याची जबाबदारी बिग बॉसने घरच्यांवर सोपवली होती पण घरातील सदस्यांना तेही करणं समजलं नाहीये.

बिग बॉस ने घरातील सदस्यांना या दोन्ही छोट्या बाळांना सांभाळण्याचं कार्य सोपवलं होतं. प्रत्येक टीम कडे एक बाळ देण्यात आलं होतं आणि बझर वाजला की, त्या बाळाचे लंगोट बदलायचे होते. मधल्या वेळेत समोरच्या टीमविषयी बाळांच्या भाषेत वाईट बोलून त्यांचं मनोरंजन करायचं होतं. पण बझर वाजताच दोन्ही टीम मध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावरून दोन्ही टीम एकमेकांशी भिडल्या. त्यात त्या बाळांचे हाल झाले.

कलर्स मराठी वर नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की दोन्ही सदस्यांमध्ये चांगलंच भांडण झालं. त्यातून दोन बाहुल्यांची खेचाखेची झाली आणि यातून त्या दोन्ही बाहुल्यांचे दोन तुकडे झाले. घरातील सदस्यांचे हे भावनाशून्य व्यक्त होणं बिग बॉसला काही पटलं नाही आणि बिग बॉस ने घरातील सदस्यांना एकत्र करत जाहीर केलं की, आता बिग बॉस ही भावना शून्य होणार आहेत.

बाळांवरून टीम A ने घातलेला धुमाकूळ आता सगळ्यांनाच महागात पडणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमा वर कधीही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : लालबागचा राजाच फटाके वाजवून स्वागत

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT