Ritesh Deshmukh humorously comments on Dhananjay Pawar's 'Baramati jacket' in Bigg Boss Marathi esakal
Premier

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी बारामती कनेक्शन कसं आलं समोर? भाऊच्या धक्क्याचा संदर्भ समजला नसेल तर ही बातमी वाचाच

Sandip Kapde

बिग बॉस मराठी हा शो महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाला आहे. शोमधील स्पर्धकांच्या प्रत्येक हालचालीवर प्रेक्षकांची नजर असते. विशेषत: शनिवार आणि रविवार हे दोन दिवस खास असतात, कारण या दिवसांमध्ये 'भाऊचा धक्का' हा विशेष भाग दाखवला जातो. प्रेक्षकांमध्ये रितेशभाऊ कुणाला धक्का देणार, याची उत्सुकता कायम असते. कालच्या एपिसोडमध्ये अशाच एका टास्कमध्ये स्पर्धकांना काही प्रश्न विचारण्यात आले, आणि उत्तर चुकल्यास शॉक देण्यात येत होता. पण या टास्कदरम्यान काहीतरी मजेदार घडले.

धनंजय पोवार, ज्याला घरातील सदस्य 'डीपी दादा' म्हणतात, गुलाबी जॅकेट घालून घरात आला होता. त्यावर रितेश देशमुखने मजेत त्याला 'बारामतीचं जॅकेट' म्हणून टोला लगावला. या हिणवण्याचा संदर्भ नेमका काय होता, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. रितेशचा हा टोला थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडलेला होता.

गुलाबी जॅकेटचा संदर्भ -

अजित पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नेहमीच त्यांच्या गुलाबी जॅकेटसाठी ओळखले जातात. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि 'लाडकी बहीण' योजना लागू झाल्यापासून अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट चर्चेत आले आहे. म्हणूनच, रितेशने धनंजय पोवारच्या गुलाबी जॅकेटला 'बारामतीचं जॅकेट' म्हणून टोला लगावला, कारण बारामती हे अजित पवारांचं गड मानलं जातं.

रितेशने धनंजयला मजेत म्हटलं, "धनंजय, तुमचं जॅकेट फार छान आहे. याचा टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण, ही तिकडची स्टाईल आहे. बारामतीची स्टाईल आता कोल्हापूरपर्यंत आली आहे असं कळतंय. छान दिसताय."

प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि शोमधील राजकीय संदर्भ

रविवारच्या एपिसोडमध्येही डीपी दादा, वैभवला म्हटल्याचं दिसला, "वैभवा, तुमच्या बारामतीकरांचं जॅकेट घातलंय बरं." या संवादातून राजकीय संदर्भ उघड झाला. बिग बॉस मराठी शोमधील अशा क्षणांना प्रेक्षक नेहमीच खूप आनंदाने बघतात, आणि शोचे निर्माते देखील अशा गोष्टींना प्रोत्साहन देतात कारण त्यातून शोची लोकप्रियता वाढते.

या साऱ्या प्रसंगामुळे बिग बॉस मराठी शोमध्ये राजकीय संदर्भांचा समावेश झाल्याचं पहायला मिळालं, ज्यामुळे शोचं आकर्षण आणखी वाढलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निकालापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये गदारोळ! भाजपाला बहुमत मिळाले नाही तर प्लॅन B काय? 5 आमदार बदलवणार सत्ता समीकरण?

Stree 2 : वरुण, कृती आणि श्रद्धाचा लव्ह ट्रँगल ? स्त्री च्या दिग्दर्शकाने उलगडला आगामी सिनेमातील ट्विस्ट

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: अर्ध्या तासात पलटली बाजी; हरियानात भाजप पुढे

Latest Maharashtra News Updates : अयोध्येतील महाराष्ट्र सदनचे आज भूमिपूजन

Google Maps Speedometer : गाडी चालवताना चुकूनही होणार नाही दंड, गुगल मॅपवर 'असं' सुरू करा स्पीड लिमिटचं अलर्ट फीचर

SCROLL FOR NEXT