bigg boss marathi 5 esakal
Premier

तर वोटिंग का घेतली? पंढरीनाथच्या एव्हिक्शनवर नेटकरी संतापले; म्हणाले- त्या सदस्याला वाचवण्यासाठी...

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' हा कार्यक्रम सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या या सीझनने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. गेल्या सगळ्या सीझनपेक्षा प्रेक्षकांना हा सीझन सगळ्यात जास्त आवडला होता. मात्र हा सीझन सगळ्यात जास्त कॉन्ट्रोव्हर्शिअल देखील ठरला. यापूर्वीही या सीझनवर अनेकदा नाराजी व्यक्त केली गेली. मात्र आता या सीझनवर प्रेक्षक नाराज आहेत. त्याचं कारण ठरलंय पंढरीनाथ कांबळे याचं एव्हिक्शन. पॅडीच्या घराबाहेर होण्यावर प्रेक्षक नाराज आहेत. बिग बॉसमध्ये आधीच सगळं ठरलेलं आहे असं नेटकरी म्हणत आहेत. पॅडीच्या घराबाहेर होण्यावर अनेक तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे घराबाहेर झाला. मर नेटकऱ्यांना हा निर्णय मुळीच पटलेला नाही. नेटकरी सोशल मीडियावर याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्यानेटकऱ्यांच्या मते या आठवड्यात वर्षा उसगावकर घराबाहेर जायला हव्या होत्या. मात्र वर्षा यांना बिग बॉसने वाचवलं आणि चांगलं खेळणाऱ्या पंढरीनाथ याला घराबाहेर केलं असा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'हा खूप चुकीचा डिसिजन आहे. जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे हे सर्व करायचे आहे तर वोटिंग का घेता?' आणखी एकाने लिहिलं, 'यांनी सुरुवातीपासून निक्कीला वाचवलं. तिने प्रत्येकवेळी कुणाला ना कुणाला आपल्या सोबत उभं केलं. घरात एकटा खेळणारा सदस्य आज घराबाहेर झाला.' तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, 'आता हे स्पष्ट झालं की वर्षा ताईचा त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणून त्या काहीही खेळत नसताना त्यांना घराबाहेर केलं गेलं नाही.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं,'इथे अनेक लोक आहेत ज्यांना वाटतं वर्षा यांनी बाहेर जायला पाहिजे होतं. त्यांना वोटदेखील कमी पडले होते मग बिग बॉस काय आपला मनमानी कारभार करत आहेत का?' अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

Anupam Kher: १.३० कोटींच्या नोटांवर गांधींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो, गुजरातमध्ये मोठा स्कॅम उघडकीस

SCROLL FOR NEXT