bigg boss marathi 5 esakal
Premier

'बिग बॉस मराठी ५ मध्ये मोठा ट्विस्ट, आज आणखी एक सदस्य होणार घराबाहेर; 'या' सदस्याच्या डोक्यावर एव्हिक्शनची तलवार

Bigg Boss Marathi Eviction Before Grand Finale: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. आज आणखी एक सदस्य घराबाहेर होणार आहे.

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' आता काही दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कायक्रमाचे शेवटचे ३ दिवस उरले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी 'बिग बॉस मराठी ५' चा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे चाहते या सीझनचा विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतंच घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. वर्षा उसगावकर या काल घराबाहेर झाल्या. त्यानंतर बिग बॉस मराठीला या सिझनचे टॉप ६ खेळाडू मिळाले. मात्र आता कलर्स वाहिनीने यात आणखी एक ट्विस्ट आणायचा ठरवला आहे. ग्रँड फिनालेपूर्वी घरातील आणखी एक सदस्य आता घराबाहेर होणार आहे. ग्रँड फिनालेमध्ये केवळ ५ सदस्य जाणार आहेत.

कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात सगळे सदस्य घरातल्या गार्डन एरियामध्ये उभे दिसत आहेत. तेव्हा बिग बॉस एक घोषणा करतात, बिग बॉस मराठीच्या या सीझनचे टॉप ६ फायनलिस्ट मी जाहीर केले. आणि इथे येत आहे ट्विस्ट. आता आपल्याला कळेल कोण आहेत टॉप ५ . असं म्हणताच सगळेच एकमेकांकडे बघू लागतात. वर्षा यांना वोटिंगमध्ये सगळ्यात कमी वोट मिळाले होते. त्यानंतर त्या घराबाहेर झाल्या. आता त्यांच्या पाठोपाठ कोण घराबाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांच्या मतानुसार, जान्हवी किल्लेकर आता घराबाहेर होण्याची शक्यता आहे.

वर्षा यांच्या पाठोपाठ जान्हवीला सगळ्यात कमी वोट मिळाले होते. त्यामुळे आता जान्हवी घराबाहेर होण्याची शक्यता आहे. तर अंकिता, सुरज, अभिजित, धनंजय आणि निक्की हे टॉप ५ असतील असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र या सदस्यांमधून ट्रॉफी कुणाला मिळणार हे पाहणं आता औसुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT