bigg boss marathi 5 eSakal
Premier

Bigg Boss Marathi 5: 'वेड' चित्रपटातील 'हा' अभिनेता दिसणार बिग बॉसच्या घरात? त्याच्या नावाची जोरदार चर्चा

Payal Naik

सध्या सोशल मीडियावर नव्याने सुरू होणाऱ्या 'बिग बॉस मराठी ५' ची जोरदार चर्चा आहे. या सीझनसाठी प्रेक्षक जरा जास्त उत्सुक आहेत कारण या सीझनमध्ये अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याजागी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची अनोखी स्टाइल पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत. त्यासोबतच या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. आता त्यातील काही कलाकारांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आता त्यातील आणखी एका कलाकाराच्या नावाचा समावेश झाला आहे.

यापूर्वी कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर ही घरात दिसणारा असल्याचं बोललं जात होतं. त्या पाठोपाठ लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यादेखील कार्यक्रमात दिसणार आहेत असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. त्यांनी चार वर्षांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून निरोप घेतला. त्यानंतर दोस्तीच्या दुनियेतील खरा यार म्हणून प्रणव रावराणे याच्या नावाची चर्चा आहे. तर रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशी याच्याही नावाची चर्चा आहे. त्यात आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं जातंय. कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये 'वेड लावणारं प्रेम तर यांच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण?' असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवरून अनेकांनी दोन ते तीन अभिनेत्यांची नावं घेतली आहेत. यात आकाश ठोसर, प्रथमेश परब यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यात सगळ्यात जास्त अभिनेता शुभंकर तावडे याचं नाव घेतलं जातंय. 'वेड' या चित्रपटात रितेश देशमुख याच्यासोबत शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आता शुभंकर या कार्यक्रमात दिसणार की नाही हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT