Bigg Boss marathi 5 esakal
Premier

BB Marathi Voting Trends: सुरज टॉपवर पण सगळ्यात कमी मतं कुणाला? शेवटच्या आठवड्यात हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' चे आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आता प्रेक्षकही या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. कारण या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी सगळे सदस्य नॉमिनेटेड आहेत. त्यात या आठवड्यात फॅमिली वीक साजरा केला केला. आता घरात राखी सावंत आणि अभिजित बिचकुले यांची घर एंट्री झाली आहे. आता या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार, या आठवड्यात तरी रितेश देशमुख दिसणार का, यावेळेस घराबाहेर कोण होणार हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत. अशात आता लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स व्हायरल झाले आहेत.

या आठवड्यात सगळ्यात जास्त वोट मिळाले आहेत सुरज चव्हाण याला. सुरजने या बिग बॉसच्या सीझनमध्ये एकहाती सत्ता राखली आहे. त्याने प्रत्येक नॉमिनेशनमध्ये सगळ्यात जास्त वोट मिळवले आहेत. तर या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिजीत सावंत. अभिजीतच्या पाठोपाठ कोलापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार याला सगळ्यात जास्त मतं मिळाली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर. आता सध्याच्या वोटिंग ट्रेंड्स नुसार हे चार स्पर्धक पहिल्या चार मध्ये आहेत.

तर पाचव्या क्रमांकावर पंढरीनाथ कांबळे आहे. प्रेक्षकांचा लाडका पॅडी या आठवड्यात घराबाहेर होणार नहिये. सहाव्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवीने आपला खेळ सुधारल्यापासून तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शेवटी वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी उरल्या आहेत. त्यातल्या निक्कीने घराबाहेर जावं यासाठी प्रेक्षक प्रयत्न करत असले तरी तिचे चाहते तिला भरभरून वोट करत आहेत. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या वोटींगवर परिणाम झाला आहे. वर्षा यांना सगळ्यात कमी वोट मिळाले आहेत. त्यामुळे त्या या आठवड्यात घराबाहेर होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

IND vs BAN, 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही

Dharmveer Movie: ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार ! फडणवीस यांनी का केला मोठा दावा?

Latest Maharashtra News Live Updates : हिजबुल्लाह नेता हसन नसराल्लाह ठार? IDF ची सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT