Bigg Boss Marathi Esakal
Premier

Bigg Boss Marathi : कचरा टाकण्यावरून राडा ते विकास-रोहितमधील हाणामारी ; बिग बॉस मराठीच्या मागच्या सगळ्या सीजनमधील गाजलेले वाद

Bigg Boss Marathi Heated Controversies : सगळ्यांचा लाडका शो बिग बॉस मराठीचा नवा सीजन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यानिमित्ताने जाणून घेऊया बिग बॉस मराठीच्या मागील सगळ्या सीजनमध्ये गाजलेल्या वादग्रस्त घटनांविषयी.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Controversies : एक घर, १५ सदस्य आणि त्यांच्यात १०० दिवसांमध्ये रंगणारे टास्क यामुळे बिग बॉस मराठी हा रिअलिटी शो कायमच चर्चेत राहिला. २०१८ साली बिग बॉस मराठीचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि पाहता पाहता सहा वर्षांमध्ये बिग बॉस मराठीची क्रेझ प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढली. आता बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

आता पाचव्या सीजनची उत्सुकता असली तरीही या आधीचे पहिले चार सीजनही चांगले गाजले. जाणून घेऊया बिग बॉस मराठीच्या आधीच्या सीजनमधील गाजलेल्या वादांविषयी.

कचरा फेकण्यावरून झाला राडा

बिग बॉस मराठीचा सीजन १ खूप गाजला. मेघा धाडे, सई लोकूर, रेशम टिपणीस अशी जबरदस्त मंडळी या सीजनमध्ये सहभागी झाली होती. या सीजनमध्ये पहिलाच टास्क मिळाला खुर्चीसम्राट. दोन टीम पाडण्यात आला होत्या आणि एका टीमला विरुद्ध टीमने काही ना काही टास्क करून खुर्चीवरून उठवायचं होतं. यावेळी मेघाच्या टीमने रेशमच्या टीमला खुर्चीवरून उतरवण्यासाठी शेव्हिंग क्रीम, कचरा, शाम्पू, हार्पिक अशा गोष्टींचा वापर केला. यामुळे दोन्ही टीममध्ये जोरदार भांडण झालं. रेशमच्या टीमने टास्क अपूर्ण सोडला. त्यानंतर मेघाची टीम जिंकली पण तिला रेशमच्या टीमकडून खूप ऐकावं लागलं. त्यांच्यात बरीच भांडणं झाली. हा वाद बराच गाजला होता.

तर यातील रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचं रिलेशनशिपही गाजलं होतं. सुरुवातीला रिलेशनशिपमध्ये असण्याचं नाटक करणारे रेशम आणि राजेश नंतर खरंच रिलेशनशिपमध्ये असल्यासारखं वागायला लागले होते. पण घरातून बाहेर आल्यावर त्यांनी यावर बोलणं टाळलं.

Khurchi Samrat

शिवानीचा राडा आणि परागची हकालपट्टी

बिग बॉस मराठी सीजन २ हा सीजन १ इतकाच गाजला. यामध्ये शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे हे स्पर्धक खूप वादग्रस्त ठरले. शिवानी आणि वीणाचं एका टास्कदरम्यान भांडण झालं यावेळी वीणाने शिवानीला लाथ मारली. त्यावरून त्यांच्यातील भांडण टोकाला पोहचलं होतं. तर काही काळाने शिवानी आजारी पडली होती आणि तिला बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडायचं होतं पण त्यावर बिग बॉस काहीच निर्णय देत नसल्यामुळे शिवानीने बिग बॉसवर केस करण्याची धमकी दिली होती. त्यावरून महेश मांजरेकर यांनी शिवानीला हाकललं होतं पण नंतर ती परत आली होती.

तर एका टास्कदरम्यान नेहा आणि पराग कान्हेरे यांच्यामधील वाद टोका पोहोचला. भडकलेल्या परागने नेहाच्या कानाखाली मारली तर वैशाली आणि परागमध्येही भांडण झालं त्यात वैशालीचं टीशर्ट फाटलं. त्यामुळे हा सीजन वादग्रस्त ठरला आणि परागलाही या शोमधून हाकलण्यात आलं.

Parag Kanhere

मित्रासाठी विशालने तोडली जेल

बिग बॉस सीजन ३ मध्येही अनेक राडे पाहायला मिळाले. पण सगळ्यात मोठं भांडण झालं जेव्हा जय आणि उत्कर्षने एका टास्कदरम्यान विकासला जेलमध्ये टाकलं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी विशालने चक्क लाथ मारून जेल तोडली. यामुळे विशालला शिक्षाही झाली. तर एका टास्कमध्ये मीरा आणि सोनालीमध्ये मारामारी झाली होती. यावरून बिग बॉसने त्यांना ताकीद दिली होती.

रोहित शिंदे आणि विकासमध्ये झाली मारामारी

बिग बॉस मराठी ४ मध्ये साखर आणि मुंगी टास्कदरम्यान रोहित आणि विकासमध्ये जोरदार भांडण झालं. हे भांडण इतकं टोकाला पोहोचलं कि दोघांमध्ये मारामारी झाली. यानंतर बिग बॉसने त्यांना जेलमध्ये टाकलं.

राखी सावंतनेही तिची कॉफीची बॉटल न मिळाल्यामुळे किचनमधील सगळं सामान तोडलं होतं त्यामुळे बिग बॉसनी तिला एका आठवड्यासाठी नॉमिनेट केलं होतं.

Vishal Chavan

तर हे होते बिग बॉस मराठीच्या सगळ्या सीजनमधील गाजलेले राडे. आता बिग बॉस मराठी सीजन ५ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. २८ जुलैपासून रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जिओ सिनेमा आणि कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा नवा सीजन प्रेक्षकांना पाहता येणार असून रितेश देशमुख या सीजनचं सूत्रसंचालन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT