bigg boss marathi live update esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 Live Updates: झुकेगा नही साला! गुलीगत धोकाची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दमदार एंट्री

सकाळ डिजिटल टीम

झुकेगा नही साला! गुलीगत धोकाची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दमदार एंट्री

आता प्रेक्षक आणखीनच उत्साहीत होणार आहेत. कारण सोशल मीडियावर गुलीगत धोका म्हणून प्रसिद्ध असलेला सुरज चव्हाण आता 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Live:'बिग बॉस मराठी ५' च्या घरात आणखी एका रीलस्टारची एंट्री

लोकप्रिय रीलस्टार, बिझनेसमॅन आणि इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार आता 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरात होणार माऊलींची भेट; 'कीर्तनकार पुरुषोत्तम यांची 'बिग बॉसच्या घरात एंट्री

'बिग बॉस मराठी ५' च्या घरात आता आणखी एका कीर्तनकाराची एंट्री झाली आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील आता 'बिग बॉस मराठीच्या घरात आले आहेत. यापूर्वी कीर्तनकार शिवलीला ताई या घरात आल्या होत्या.

हस्सल मधली मराठी मुलगी गाजवणार 'बिग बॉस मराठी ५', रॅपर आर्याची घरात एंट्री

अमरावतीची रॉकस्टार रॅपर आर्या जाधव आता 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसत आहे.

BB Marathi 5 Live: 'मन झालं बाजिंद' फेम अभिनेत्याची स्प्लिट्सव्हिला फेम अभिनेत्यासोबत बिग बॉसच्या घरात एंट्री

मन झालं बाजिंद' या मालिकेतील अभिनेता वैभव चव्हाण आणि स्प्लिट्स व्हिलामधील लोकप्रिय स्पर्धक अरबाज पटेल बिग बॉसच्या घरात आलेले आहेत.

BB Marathi Live: बिग बॉस १४' गाजवणाऱ्या निकी तांबोळीची मराठी बिग बॉसमध्ये हजेरी

तामिळ आणि तेलगू चित्रपटांमधून पाणी हिंदी मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री निकी तांबोळी यावेळेस घरात राडा घालताना दिसणार आहे. निकीने यापूर्वी 'बिग बॉस १४' मध्येही सहभाग घेतला होता

BB Marathi 5 Live : 'बिग बॉस मराठी ५' मध्ये परदेसी गर्ल इरिना रुदाकोवाची एंट्री

लोकप्रिय परदेशी मॉडेल इरिना रुदाकोवा आता 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात दिसणार आहे. ती प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Chota Pudhari In Bigg Boss Marathi 5 Live: 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसणार छोटा पुढारी

छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे आता बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे.

Abhijeet Sawant In Bigg Boss Marathi 5: इंडियन आयडॉल विजेता अभिजित सावंत याची बिग बॉस मराठीमध्ये एंट्री

लोकप्रिय गायक अभिजित सावंत याची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये एंट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi 5 Live: 'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसणार नायिका आणि खलनायिकेची जोडी, कोण आहेत त्या?

'भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेदार आता 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात दिसणार आहे. तर जीव माझा गुंतला मधील अंतरा अभिनेत्री योगिता चव्हाण हिची देखील बीबी मराठीमध्ये एंट्री झाली आहे.

Pandharinath Kamble Live : प्रेक्षकांच्या लाडक्या पॅडीची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दमदार एंट्री

आपल्या विनोदी शैलीच्या आधारावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ कांबळे आता बिग बॉसच्या घरात आला आहे.

BB Marathi 5 Live: रमा राघव फेम अभिनेत्याची कोकण हार्टेड गर्ल सोबत बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री

रमा राघव फेम निखिल दामले याची कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सोबत बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री झाली आहे.

Varsha Usgaonkar Live: 'बिग बॉस मराठी 5'च्या घरातील पहिल्या सदस्य

लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर 'बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या सदस्य ठरल्या आहेत.

उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

'बिग बॉस मराठी ५'च्या घराचं दार दोन वर्षांनी उडणार, घरात असणार चक्रव्यूह, डीलेमारू हे या चक्रव्यूहाच नाव असणार आहे.

'बिग बॉस मराठी ५' जिओ अ‍ॅपवर पाहण्यासाठी किती पैसे लागतील?

'बिग बॉस मराठी ५' कलर्स मराठीसोबतच जिओ अँपवरही दाखवण्यात येणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला महिन्याचा रिचार्ज करावा लागेल. जिओ अ‍ॅपच्या महिन्याभराच्या रिचार्जची किंमत फक्त २९ रुपये आहे. यात महिनाभर तुम्ही प्रीमियम चित्रपट आणि वेबसीरिजही पाहू शकता.

बिग बॉस मराठीच्या घरात शुभंकर तावडेची एंट्री?

लोकप्रिय अभिनेता शुभंकर तावडेदेखील 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याने स्वतः एक पोस्ट करत या बातमीला दुजोरा दिला होता.

'बिग बॉस १४' गाजवणाऱ्या अभिनेत्रीची मराठीत एंट्री

लोकप्रिय हिंदी अभिनेत्री निकी तांबोळी 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसणार आहे. तिने 'बिग बॉस १४' मध्ये घरात राडा केला होता. आता प्रेक्षक तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकप्रिय गायकाची होणार एंट्री

'इंडियन आयडल ' गाजवणाऱ्या अभिजित सावंतची बिग बॉसच्या घरात एंट्री होणार आहे. त्याचा एक प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे. त्यावरून चाहत्यांनी त्याचं नाव सांगतलं आहे.

Bigg Boss Marathi House Disappointed Users Live : 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात नाहीये 'ती' गोष्ट, चाहते नाराज

बिग बॉस मराठी ५च्या घराची बरीच चर्चा झाली. मात्र या घरात काही गोष्टी नसल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. हे मराठमोळं घर आहे. त्यामुळे या घरात मराठी गोष्टी असल्याचं पाहिजेत. अंडरवॉटर थीम असलेल्या या घरात तुळशी वृंदावन नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये तुळशी वृंदावर दिसलं नसल्याने चाहते नाराज झालेत. तर प्रत्येक सीझनला घरात असणाऱ्या नथ आणि चंद्रकोर या गोष्टीही यावेळेस घरात दिसत नाहीयेत. त्याचाही उल्लेख नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय.

Bigg Boss Marathi House Photos live :अंडरवॉटर थीम बेडरूम ते जंगल; कसं आहे बिग बॉस मराठीचं नवीन ग्रँड हाऊस पाहा

यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात अनेक बदल करण्यात आले असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळालं. यावेळी बिग बॉस मराठीचं घर दोन वेगवेगळ्या थीमचं कॉम्बिनेशन करून बांधण्यात आलं आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या घराला ग्रँड एंटरन्स मिळाला असून मुख्य दरवाजावर एक मोठी माणसाच्या चेहऱ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर बिग बॉस मराठीच्या गेटवर सुद्धा तशी प्रतिकृती दिसत असून त्यात मानवी स्वभावातील विविध रूपं रेखण्यात आली आहेत. तर यावेळी बिग बॉस मराठीच्या बेडरूम्समध्ये अंडरवॉटर थीम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बेडरूम्स जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन असलेल्या इंटिरियरमध्ये सजवलेले असतील. तर यावेळची कॅप्टन रूम मोठी असून पूर्णपणे काचेची करण्यात आली आहे. बाथरूमचा दरवाजा लिफ्टच्या दरवाजाप्रमाणे करण्यात आला आहे. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात मोठी कॅप्टन रूम उभारण्यात आली आहे. तर बाथरूमसुद्धा अंडरवॉटर थीममध्येच तयार केल्याचं दिसत आहे.

Riteish Deshmukh In BB Marahi 5 live : रितेश देशमुख करणार कल्ला!  होणार ग्रँड एंट्री

प्रेक्षक गेले वर्षभर 'बिग बॉस मराठी'ची आतुरतेने वाट पाहत होते. यावेळेस कार्यक्रमाचा होस्ट बदलल्याने नवीन काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यावेळेस अभिनेता रितेश देशमुख कार्यक्रमाचा होस्ट असणार आहे. रितेशची प्रिमिअरला ग्रँड एंट्री होणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Live: बिग बॉस मराठी ५ साठी प्रेक्षक उत्सुक

'बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आजपासून सुरू होतो आहे. त्यामुळे प्रेक्षक या सीझनसाठी प्रचंड उत्सुक आहेत. रात्री ९ वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमिअर कलर्स मराठी आणि जिओ अँपवर पाहता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT