कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन चांगलाच चर्चेत आहे. घरातील वाद, गटामधील राजकारण पहिल्या आठवड्यापासून रंगल्याचं बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळतंय. 7 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये या सिजनचं दुसरं नॉमिनेशन पार पडलं. नॉमिनेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आघाडीवर आहे जाणून घेऊया.
काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सहा सदस्य नॉमीनेट झाले. निक्की तांबोळी, निखिल दामले, घनश्याम दरवडे, योगिता चव्हाण, पंढरीनाथ कांबळी, सूरज चव्हाण हे सदस्य नॉमीनेट झाले आहेत. यातील योगिता आणि सूरज हे पहिल्या आठवड्यातही नॉमीनेट झाले होते. नॉमिनेशनच्या दुसऱ्याच दिवशी कोणता कलाकार मतांमध्ये आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
बिग बॉस मराठी इरा या इन्स्टाग्राम पेजने नुकतेच नॉमिनेशन नंतरच्या पहिल्या दिवसाचे वोटिंग ट्रेंड सोशल मीडियावर शेअर केले. लेटेस्ट वोटिंग ट्रेण्डनुसार सूरज चव्हाण पुन्हा एकदा आघाडीवर आहे. प्रेक्षकांनी त्याला भरभरून मत दिलं आहे तर दुसऱ्या स्थानावर आहे निक्की तांबोळी. घरातील व्हिलन ठरलेल्या निक्कीचा वावर प्रेक्षकांना आवडतोय त्यामुळे निक्कीच्या चाहत्यांनी तिला भरभरून वोट केलं आहे. तिसऱ्या स्थानावर आहे योगिता चव्हाण. यावेळी कॅप्टन्सी टास्कमध्ये योगीताने केलेला परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला आहे. तर निखिल दामले चौथ्या स्थानावर आहे. पंढरीनाथ कांबळे पाचव्या स्थानावर असून घनश्याम दरवडे सगळ्यात शेवटी सहाव्या स्थानावर आहे. छोटा पुढारीला सध्या सगळ्यात कमी मत पहिल्याच दिवशी पडली आहेत.
पंढरीनाथ कांबळी आणि घनश्याम सध्या सगळ्यात कमी वोट्स असणाऱ्या सदस्यांमध्ये आहेत. या दोघांचा घरातील वावर तितका लक्षवेधी नाहीये त्यामुळे यावेळी घरातून बाहेर होणारा सदस्य या दोघांपैकी असणार ? की दुसराच कुणी घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
गेल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर पडले. त्यांचं शांत राहणं, घरातील गोष्टींमध्ये सामील न होणं अनेकांना खटकलं. त्यामुळे या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहील आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.