bigg boss ott 3
bigg boss ott 3 sakal
Premier

Bigg Boss Ott New Rule: मोबाईलही वापरता येणार, वेळही कळणार, बदलले बिग बॉस ओटीटी ३ चे नियम, आणखी काय आहे नवीन?

Payal Naik

Bigg Boss Ott 3: २१ जून २०२४ रोजी 'बिग बॉस ओटीटी ३' चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातून अनेक कलाकारांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. काही युट्यूबर आहेत तर काही कन्टेन्ट क्रिएटर्स आहेत. सना सुल्तानदेखील या कार्यक्रमाचा भाग आहे. मात्र ती स्पर्धक म्हणून नाही तर एक एजंट म्हणून घरात पोहोचली आहे. दुसरीकडे या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरातील काही नियमदेखील बदलण्यात आले आहेत. यापूर्वी बिग बॉसच्या घरात फोन वापरण्यास बंदी होती. मात्र आता बिग बॉसने स्वतः सगळ्या स्पर्धकांना फोन दिले आहेत.

बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना फोन दिले आहेत. त्यावरून ते एकमेकांशी बोलू शकणार आहेत. सोबतच चॅटिंगही करू शकणार आहे. या फोनवर एक चॅट अ‍ॅप्लिकेशन आहे. त्यावरून ते एकमेकांशी संपर्क करू शकणार आहेत. मात्र या फोनमध्ये सीम कार्ड देण्यात आलेलं नाही. याशिवाय बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये सदस्यांना घड्याळ दिलेलं नसल्याने त्यांना वेळ कळत नव्हती. मात्र यावेळेस त्यांच्या हातात फोन असल्याने त्यांना वेळही कळणार आहे.

तर दुसरीकडे सना सुल्तान जी एजंट बनून आली आहे. तिला बिग बॉसकडून सगळी माहिती मिळत राहणार आहे. बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे तिच्याकडे इम्युनिटी असेल आणि तिला नॉमिनेट केलं जाणार नाही. तिला घरात सगळ्या सदस्यांवर लक्ष ठेवायचं आहे पण जर बिग बॉसला असं वाटलं की ती तिचं काम व्यवस्थित करत नाहीये तर मात्र तिच्याजागी दुसऱ्या स्पर्धकाला एजंट बनवण्यात येईल. यावेळेस बिग बॉसमध्ये बऱ्याच गोष्टी नवीन पाहायला मिळत आहेत. सध्या फोन आणि एजंट नवीन आहेत, मात्र पुढे आणखीही काही गोष्टी नव्याने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे सध्या 'बिग बॉस ओटीटी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजी एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT