Sangram Chougule Sakal
Premier

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

सकाळ वृत्तसेवा

Sangram Chougule Exit From Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचा ५ वा सिजन सध्या गाजतोय. गेल्या आठ आठवड्यात मोठ्या प्रमाणात टीआरपीही या सिजनला मिळालाय.

अशात दोन आठवड्यापूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्रीसह बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात आले होते. पण आता दोन आठवड्यात त्यांना घराबाहेर पडावे लागले आहे. यामागील कारण म्हणजे संग्राम यांना झालेली दुखापत.

आठव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क सुरू असताना अरबाजबरोबर झटापटीदरम्यान संग्राम यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तसेच पाठीलाही इजा झाली आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडून तपासण्यात आले असून रिपोर्ट आले आहेत.

या दुखापतीमुळे संग्राम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागणार असल्याचे बिग बॉसने सांगितले आहे. याच कारणामुळे संग्राम यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

संग्राम सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सामील झाले होते. त्यांची घरात आल्यानंतर पहिल्याच आठवड्यानंतर रितेश देशमुख यांच्याकडून भाऊच्या धक्क्यावर कानउघडणीही करण्यात आली होती. तसेच त्यांची जान्हवी किल्लेकरबरोबर चांगली मैत्रीही दिसली. मात्र आता संग्राम यांना दुखापतीमुळे या घरातून बाहेर जावे लागले आहे.

आर्याही घराबाहेर

दरम्यान, आर्या जाधव हिला देखील सातव्या आठवड्यानंतर बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या मतांमुळे नाही, तर घरात हिंसाचार केल्याने बाहेर पडावे लागले होते. तिने निक्की तांबोळी हिच्या कानाखाली मारल्याने तिला घराबाहेर जावे लागले होते.

आणखी एक सदस्य होणार घराबाहेर

संग्राम हे दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. मात्र अद्याप आठव्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोण घराबाहेर होणार हे रविवारी समजणार आहे. आठव्या आठवड्यात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, सुरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर हे पाच सदस्य नॉमिनेशनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT