Salman Khan Esakal
Premier

Salman Khan : सलमान नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता 'मैंने प्यार किया' सिनेमातील प्रेम

बॉलिवूडमधील एका दिग्गज कलाकाराने 'मैने प्यार किया' मधील प्रेम ही भूमिका साकारण्यासाठी त्याची निवड झाली होती असा खुलासा केला आहे. कोण आहे हा कलाकार जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील एक रोमँटिक क्लासिक सिनेमा म्हणजे 'मैंने प्यार किया'. सूरज बडजात्या यांचं दिग्दर्शन आणि सलमान खान, भाग्यश्री यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. नुकतंच बॉलिवूड मधील आघाडीचे गीतकार आणि अभिनेते पियुष मिश्रा यांनी या सिनेमाबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला.

पियुष यांनी केला मोठा खुलासा

पियुष मिश्रा यांनी नुकतंच झूमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला कि,"जेव्हा मी एनएसडीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होतो तेव्हा सूरज बडजात्यांचे वडील यांच्या डोक्यात आधी माझं नाव आलं होत. त्यावेळी सिनेमाची तयारी सुरु होती. आमची प्राथमिक बोलणी झाली तेव्हा सिनेमाविषयीची कोणतीही योजना तयार नव्हती.हे जेव्हा घडलं तेव्हा मी तिसऱ्या वर्षाला शिकत होतो पण नंतर गोष्टी बदलल्या. त्यावेळी माझ्या डोक्यात आता मी स्टार होईन वगैरे असं काही नव्हतं. "

"त्यानंतर बऱ्याच गोष्टी मध्ये घडल्या. मी मुंबईला या सिनेमाचं ऑडिशन देण्यासाठी येणार होतो. पण मला असं वाटतं कि, अजून बऱ्याच लोकांना या सिनेमासाठी विचारलं असेल. "

"मी स्टारडम सांभाळू शकलो नसतो"

पण पुढे गोष्टी बदलल्या आणि सलमानची प्रेम या भूमिकेसाठी निवड झाली. यावर पियुष यांनी म्हंटल कि ते ही भूमिका सलमान किंवा मी कोणी चांगली साकारली असती यावर वाद घालून ते थकलेत. "सलमानने ही भूमिका उत्तम साकारलीय आणि मला वाटतं त्याची निवड झाली हे बरं झालं. मी हे स्टारडम सांभाळू शकलो नसतो." असं त्यांनी म्हंटलं.

सलमान खान आणि भाग्यश्री यांची मुख्य भूमिका असलेला मैने प्यार किया हा सिनेमा सुपरहिट झाला. सलमान आणि भाग्यश्रीची जोडी तर गाजलीच पण या बरोबरच या सिनेमातील गाणीही लोकप्रिय ठरली. अजूनही या सिनेमातील गाणी प्रेक्षक आवर्जून ऐकतात.

या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात आलोक नाथ, रीमा लागू, राजीव वर्मा, अजित वच्छानी, मोहनीश बहल यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT