Kiara and Sidharth at Wimbledon Quarter Final Esakal
Premier

Wimbledon 2024 : विम्बल्डनची क्वार्टर फायनल पाहायला पोहोचलं बॉलिवूडचं स्टार कपल ; पेस्टल ब्लु पॅन्ट-सुटमधील कियाराचा लूक चर्चेत, "हा बेस्ट अनुभव..."

सकाळ डिजिटल टीम

Sidharth Malhotra & Kiara Advani : बॉलिवूडमधील स्टार कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी एकत्र लंडनमध्ये पार पडलेली विम्बल्डनची क्वार्टर फायनल एन्जॉय केली. सोशल मीडियावर कियाराने या सुंदर क्षणाचे फोटो शेअर केले.

कियाराचा लूक

यावेळी या दोघांनीही फॉर्मल लूक केला होता. कियाराने पेस्टल ब्लु रंगाचा पॅन्ट-सूट वेअर केला होता तर सिद्धार्थने क्रीम ब्लेझर, शर्ट आणि पॅन्ट या लूकमध्ये हजेरी लावली होती. मिनिमम मेकअप, नो ज्वेलरी आणि हिल्स या लूकमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती.

नवऱ्याला दिलं क्रेडिट

सोशल मीडियावर कियाराने फोटो शेअर करत पोस्ट लिहिली कि,"मला हे मान्य करायलाच हवं कि टेनिस या खेळाशी माझी ओळख नुकतीच माझ्या नवऱ्याने मला करून दिली आणि हा एक उत्तम अनुभव होता. विम्बल्डनची सेंटर कोर्टमधील लाईव्ह मॅच, स्ट्रॉबेरी आणि क्रीम याहून उत्तम अजून काय असून शकतं?"

स्टार स्पोर्ट्सने घेतली दखल

'स्टार स्पोर्ट्स' या वाहिनीनेही कियारा आणि सिद्धार्थची एक खास मुलाखत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली. यावेळी या दोघांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. कियाराने तिचा आवडता खेळाडू अल्कराज असल्याचं सांगितलं तर सिद्धार्थने त्याचा आवडता टेनिस प्लेयर अँड्री अगासी असल्याचं सांगितलं. लहानपणापासून तो त्याला फॉलो करत असल्याचं तो यावेळी म्हणाला.

सोशल मीडियावर यांच्या विम्बल्डन मधील हजेरीची चर्चा असून अनेकांनी या जोडीचं कौतुकही केलंय. ७ फेब्रुवारी २०२३ ला या दोघांनी जैसलमेरमध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मोजक्या माणसांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT