Allu Arjun sakal
Premier

Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

priyanka kulkarni

Allu Arjun: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.पण अल्लू अर्जुन सध्या अडचणीत सापडला आहे. काल (शनिवार) अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मे रोजी तो आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे पोहोचले होता. जिथे ते त्याचे मित्र आणि YSRCP चे आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे राहतात. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना तो रेड्डी यांच्या घरी आल्याचं कळालं. त्यामुळे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांनी रेड्डी यांच्या घराबाहेर गर्दी केली. पण यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचे मित्र आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला. जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाबद्दल...

YSRCP चे आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी उर्फ शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे पुन्हा निवडणूक लढत आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जुननं रेड्डी यांच्या घरी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावली. अशातच रेड्डी यांच्या घराबाहेरल अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. अल्लू अर्जुनने घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना बघत होता. यावेळी लोक 'पुष्पा-पुष्पा' अशा घोषणा देत होते.

आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल

शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी आणि अल्लू अर्जुन यांच्यावर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्पा रवि चंद्रा यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होईल हे जाणून आरओ नंद्याल यांच्या परवानगीशिवाय अल्लू अर्जुनला घरी बोलावले, असे तक्रारीत म्हटले आहे.

"माझा मित्र अल्लू अर्जुन, तू निवडणुकीसाठी मला शुभेच्छा देण्यासाठी नंद्यालपर्यंत प्रवास केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझा पाठिंबा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि आमच्या मैत्रीबद्दल मी खूप कृतज्ञ आहे!", असं ट्वीट आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी यांनी केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT