Premier

अभिनयक्षेत्रात काम करायचंय ? या विनामूल्य प्लॅटफॉर्ममुळे मिळवा चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची संधी !

Casting process to work in serials : अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असलेल्यांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिल्म, टीव्ही, आणि ओटीटी इंडस्ट्री सध्या जोरदार वाढत आहे. अभिनय, गायन, नृत्य, दिग्दर्शन, कॅमेरा, पटकथा लेखन आणि इतर अनेक संधी उपलब्ध आहेत. पण, अनेक दूरच्या शहरांमध्ये, गावांमध्ये राहणाऱ्या प्रतिभावान कलाकारांना या संधी मिळणं सुद्धा खरंतर कठीण असतं. कोविडनंतर त्यांची शहरात येऊन काम करण्याची स्वप्नंही अपुरी राहिली आहेत.

एखाद्या प्रादेशिक प्रतिभावान कलाकाराचे उदाहरण पाहूया. नागपूरच्या एका लहान गावातील एक गुणी कलाकार शिल्पा, जिचं स्वप्न आहे ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठी हिरॉईन व्हायचं. ती नेहमीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे अनुकरण करत, तिच्या मोठ्या स्वप्नांमध्ये हरवून जायची. पण भेदक वास्तव मात्र तिला ते स्वप्नांतून बाहेर आणायचं. तरीही एकदा धीर करून ती मुंबईला आली. पहिला मुंबईमध्ये जिथे ऑडिशन होतात त्या जवळ घर शोधण्याचे दिव्य, नंतर ऑडिशनच्या लाईनमध्ये तासंतास वाट पाहत होणारी जीवघेणी तीव्र स्पर्धा यामुळे ती घाबरली. नंतर मुंबईमधील उच्च जीवन, त्यावर होणारा खर्च आणि मनोरंजन इंडस्ट्रीतील योग्य संपर्काअभावी ऑडिशन मिळवणं सुद्धा तिला अशक्य झालं. शेवटी काही काळानंतर माझं मुंबईसारख्या मोठ्या शहरात काहीच होऊ शकत नाही या नैराश्याच्या भावनेने ती तिच्या घरी परतली.

केवळ शिल्पाचं नाही तर असे अनेक कलाकार विविध कारणांमुळे निराश होऊन घरी परततात. केवळ योग्य व्यक्तींना आपलं काम नाही दाखवता आल्यामुळे नैराश्याने अनेक प्रतिभावान कलाकार अयशस्वी होतात. पण आता या नवीन कलाकारांना अतिशय मोफत आणि योग्य मार्गदर्शन करणारे, कलाकारांना यशस्वी घडवणारे डिजिटल कास्टिंग प्लॅटफॉर्म आलं आहे. शिल्पासारख्या असंख्य स्वप्न बाळगणाऱ्या लोकांसाठी, 'कास्टिंग वाइब' हा कास्टिंगचा डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज आहे.

कास्टिंग वाइब: टॅलेंटेड चेहरा शोधण्यासाठी झालेली डिजिटल क्रांती

कास्टिंग वाइब ह्या डिजिटल कास्टिंग प्लॅटफॉर्मने भारतातील कानाकोपऱ्यातून मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावान टॅलेंट शोधण्याचे काम हाती घेतले आहे. कास्टिंग वाईबने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या निर्मितीसंस्था, TV वाहिनी आणि ओटीटीशी आणि त्याच्या कास्टिंग टीमशी संलग्न होऊन हा प्लॅटफॉर्म नवीन कलाकारांसाठी तयार केला आहे. मनोरंजन क्षेत्रातील प्रादेशिक प्रतिभावान कलाकारांचा भारतीय मनोरंजन क्षेत्रातील प्रवेश कास्टिंग वाईबने अतिशय सोपा आणि पूर्णपणे विनामूल्य केला आहे. डिजिटल ऑडिशनमुळे संपूर्ण भारतातील अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि इतर असंख्य प्रादेशिक प्रतिभावान कलाकार आता विनामूल्य कास्टिंग वाईब या डिजिटल कास्टिंग प्लॅटफॉर्मवर स्वतःची फ्री प्रोफाइल बनवू शकतात.

कास्टिंग वाइब डिजिटल कास्टिंग प्लॅटफॉर्म कलाकारांना कशी मदत करतो?

प्रादेशिक कलाकार त्यांची प्रतिभा, अनुभव, फोटो, ऑडिशन व्हिडिओ, बॉडी टाइप्स आणि सोशल मीडिया लिंक अशा सर्व गोष्टींची माहिती दाखवणारे विनामूल्य प्रोफाइल्स तयार करू शकतात. प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या नावाची प्रोफाइल URL मिळते जी डिजिटल व्हिजिटिंग कार्ड म्हणून कार्य करते. ही प्रोफाइल URL कलाकार सोशल मीडिया आणि अनेक व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर सहजपणे शेअर करू शकतात. ही प्रोफाइल कलाकारांबद्दलची आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती कास्टिंग डायरेक्टर्सना एका फॉरमॅटमध्ये डिजिटली मिळते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेसाठी योग्यतेचं मूल्यांकन करणं सोपं होतं.

मोठ्या निर्मितीसंस्था, TV वाहिनी आणि ओटीटीना प्रोफाइल पाठवणे: कास्टिंग वाइब टीम या प्रोफाइल्सचा वापर OTT सेवांवर जसे Zee5, SonyLiv, Netflix India, Star Plus, Colors TV, Hotstar, आणि Amazon Prime Video तसेच TV दिग्गज Zee, Star, Sony, आणि Colors यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी करते. तसेच, मोठ्या निर्मितीसंस्था जसे की धर्मा प्रोडक्शन, बालाजी टेलीफिल्म्स, आणि इतर अनेक यांच्या कास्टिंग टीम्सना वेळोवेळी प्रोफाइल्स फॉरवर्ड करून हे ह्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सपर्यंत या कलाकारांना पोहचवण्याचे काम विनामूल्य करते.

मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या निर्मितीसंस्था, TV वाहिनी आणि ओटीटी कास्टिंग वाईबवर नवीन कलाकार कसे शोधतात?

मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या निर्मितीसंस्था, TV वाहिनी आणि ओटीटी यांचे कास्टिंग डायरेक्टर, कास्टिंग वाइबच्या विनामूल्य डिजिटल कास्टिंग प्लॅटफॉर्मवर अतिशय सोप्या पद्धतीने यावर कलाकारांनी बनवलेल्या प्रोफाईल्स त्यांच्या अभिनयाच्या गरजेच्या पात्राप्रमाणे पाहू शकतात आणि भारताच्या कोणत्याही शहरातून आणि गावातून नवंनवीन चेहरे आणि प्रतिभावान कलाकारांना प्रभावीपणे शोधू शकतात. डिजिटल प्रोफाइलमुळे पारंपरिक पद्धतीने कलाकार शोधण्याचा वेग आणि वेळ या दोन्हीचा फायदा मोठ्या प्लॅटफॉर्मना होतोय.

AI तंत्रज्ञानाचा वापर

कास्टिंग वाइबचे आगामी AI तंत्रज्ञान प्रत्येक कलाकाराच्या प्रोफाइलचं बारकाईने विश्लेषण करेल, त्यांच्या कौशल्ये, अनुभव, आणि पूर्वीच्या कामगिरीचा विचार केला जाईल. हा AI कलाकारांना त्यांच्या अनोख्या ताकदीनुसार कास्टिंग कॉल्सशी जुळवेल आणि कास्टिंग डिरेक्टरना कास्टिंग करणे आणखी सोपे होईल.

'हे' आघाडीचे कलाकार वापरतात कास्टिंग वाईब

फक्त स्ट्रग्लर्स नाही तर मराठीतील हे आघाडीचे कलाकारही कास्टिंग वाईब वापरत आहेत. हृता दुर्गुळे, पूर्वा गोखले, मिलिंद पाठक, रजत दहिया, ऋतुजा बागवे, सिद्धार्थ बोडके, वल्लरी लोंढे, भूषण प्रधान, रसिका सुनील, अभिजीत केळकर, गौरव घाणेकर, जुई गडकरी, विवेक सांगळे, हर्षद अटकरी, नक्षत्र मेढेकर, तन्वी मुंडले , गिरीजा प्रभू आणि अनेक इतर प्रसिद्ध कलाकार या प्लॅटफॉर्मवर सहभागी झाले आहेत.

जर तुम्ही अभिनय, गायन, नृत्य, दिग्दर्शन, कॅमेरा, पटकथा लेखन आणि इतर अशा कोणत्याही मनोरंजन क्षेत्रातील असाल तर तुम्हाला केवळ कास्टिंग वाईबच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन स्वतःची विनामूल्य प्रोफाइल बनवायची आहे आणि कास्टिंग वाईबच्या कुटुंबामध्ये सामील व्हायचे आहे. कास्टिंग वाईबची टीम तुमची प्रोफाइल मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या निर्मितीसंस्था, TV वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कास्टिंग टीमपर्यंत पोहचवण्याचे काम करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT