Premier

Sonkashi & Zaheer Wedding : लाल चुडा, भांगात कुंकू ; सोनाक्षीचा रिसेप्शन लूक चर्चेत तर नवऱ्याबरोबर केलेल्या डान्सचेही व्हिडीओ झाले व्हायरल

Sonakshi & Zaheer : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबालच्या रिसेप्शनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालशी काल २३ जूनला लग्नगाठ बांधली. रजिस्टर पद्धतीने पार पडलेला हा विवाहसोहळा सोनाक्षी आणि झहीरच्या नव्या घरी पार पडला. घराच्या बाल्कनीत या दोघांनी रजिस्टर पेपर्सवर सह्या करत त्यांच्या लग्नाची नोंद केली. पण याबरोबरच चर्चा झाली ती सोनाक्षी झहीरच्या ग्रँड रिसेप्शनची.

रिसेप्शनवेळी सोनाक्षी आणि झहीरने केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती तर गळ्यात चोकर, भांगात भरलेलं कुंकू, हातावर मेहेंदी आणि लाल चुडा असा लूक तिने रिसेप्शनला केला होता तर झहीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. सोशल मीडियावर त्यांच्या या लूकच कौतुक होतंय.

सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज आणि दिग्गजांनी हजेरी लावली. काजोल, रेखा, सलमान खान, अनिल कपूर, चंकी पांडे, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ, हनी सिंह, सायरा बानू, तब्बू, विद्या बालन आणि तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर, रविना टंडन, फरदीन खान, रिचा चड्ढा, अली फैजल, संजय लीला भन्साळी, शर्मीन सेगल, हुमा कुरेशी, साकिब सलीम, संजिदा शेख यांनी हजेरी लावत नवीन जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

रिसेप्शनला सोनाक्षी आणि झहीरने डान्स फ्लोअर गाजवला. हजर राहिलेल्या पाहुण्यांपेक्षा या जोडीने स्वतःच्या रिसेप्शनला खूप डान्स केला. 'छैय्या छैय्या', 'चिकनी कमर','अंग्रेझी बीट','आफरी आफरी' या गाण्यावर त्यांनी डान्स केले. इतकंच नाही तर सोनाक्षीच्या दबंग सिनेमातील गाण्यावर या दोघांनी केलेला डान्सही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्यतिरिक्त त्यांचं रिसेप्शनला ढोलही वाजवण्यात आला ज्यावर सगळे सेलिब्रिटीज थिरकले. तर हनी सिंहनेही त्याच्या खास मैत्रिणीसाठी रिसेप्शनमध्ये खास परफॉर्मन्स सादर केला. तर सोनाक्षीचे आई वडील शत्रुघ्न आणि पूनम यांच्या हजेरीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

इतकंच नाही सोनाक्षी आणि झहीरने पापाराझींबरोबरही खास फोटोज काढले आणि त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर या दोघांच्या कृतीचं कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT