Premier

Chandu Champion : कोण आहेत मुरलीकांत पेटकर? ; कार्तिकालाही बसला नव्हता या व्यक्तीच्या अस्तित्वावर विश्वास

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला चंदू चॅम्पियनचा ट्रेलर सगळीकडे गाजतोय. कधीही हार न मानणाऱ्या एका तरुणाची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अॅथलीट मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.

सिनेमाचा ट्रेलर व्हायरल होताच मुरलीकांत पेटकर नक्की कोण आहेत याची चर्चा सगळीकडे रंगू लागलीये.

कोण आहेत मुरलीकांत पेटकर?

मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत. मूळचे सांगली इस्लामपूर भागातील असलेल्या मुरलीकांत यांना लहानपणापासून खेळाची आवड होती. शालेय जीवनातच कुस्ती, हॉकी ,हॉकी आणि मैदानी खेळात चमक दाखवली होती. पुढे सैन्यदलात ते भरती झाले.

सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली. 1964 मध्ये जपानमध्ये पार पडलेल्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये त्यांनी भारतातर्फे बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता.

1965 च्या भारत-पाक युद्धात ते गंभीर जखमी झाले. त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. पण त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे ते वाचले. अपंगत्व येऊनही हार न मानता ते पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले.

जर्मनीतील हेडलबर्ग येथे ऑगस्ट १९७२ च्या ग्रीष्म पॅराऑलिम्पिकमधील त्यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.[१] त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित केला.याशिवाय त्यांनी सलग पाच वर्षे सहभाग घेत या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. ते उत्तम भालाफेकपटू आणि गोळाफेकपटू होते.

त्यानंतर त्यांनी पुण्यातील टेल्को कंपनीत काही काळ काम केलं आणि सध्या ते निवृत्त जीवन जगत आहेत. 2018 मध्ये त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मुरलीकांत यांचा प्रवास ऐकून कार्तिकही झाला थक्क

जेव्हा कार्तिकला दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी या सिनेमाची कथा ऐकवली तेव्हा ही व्यक्ती अस्तित्वात आहे, ही गोष्ट खरी आहे यावर कार्तिकचा विश्वास बसला नव्हता.

विशेष म्हणजे सिनेमाला होकार दिल्यानंतरही हा सिनेमा कसा करणार? हा प्रवास आपण कसा दाखवू शकतो याबाबत कार्तिक साशंक होता. कार्तिकच्या मते, त्यांचा प्रवास इतका कठीण आहे कि, तो स्वतः ते निभावू शकेल कि नाही याची त्याला खात्री वाटत नव्हती.

या सिनेमासाठी कार्तिकने बरीच मेहनत घेतली. त्याने बरंच वजन कमी केलं. या सिनेमा व्यतिरिक्त इतर कोणत्याही सिनेमाचं शूटिंग त्याने केलं नाही.

14 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कार्तिकसोबत अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री हेमांगी कवी कार्तिकच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT