chandu champion ott  esakal
Premier

Chandu Champion OTT Release: १२ दिवसांनी ओटीटीवर येणार कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन', वाचा कधी आणि कुठे पाहाल

Chandu Champion OTT Release Date: कार्तिक आर्यन याच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात भाग्यश्री पटवर्धन, राजपाल यादव, भुवन अरोरा, विजय राज आणि अनिरुद्ध दवे सारखे स्टार्सही दिसले होते. 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर 73.5 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. मात्र प्रेक्षकांकडून चित्रपटाला प्रेम मिळालं होतं. हा चित्रपट क्रिटिक्सच्याही पसंतीस उतरला होता. आता तो OTT वर घरबसल्या पाहता येणार आहे. केव्हा आणि कुठे पाहाल हा चित्रपट?

कार्तिक आर्यनने 'चंदू चॅम्पियन'मध्ये मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. लाखो लोकांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आता तुम्ही घरबसल्या पाहू शकता. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 12 दिवसांनी या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येईल. म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.25 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 20.25 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 4.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण ७३.५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे जगभरात 87.25 कोटींचे कलेक्शन केले आहे.

कार्तिक आर्यनने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. कार्तिकने 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'पति पत्नी और वो', 'लव्ह आज कल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो 'भूल भुलैया 2', 'फ्रेडी', 'सत्यप्रेम की कथा' सारख्या चित्रपटात दिसली आहे. आता तो 'भूल भुलैया 3' मध्ये रुहान रंधावा उर्फ ​​रूह बाबाच्या अवतारात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT