Chandu Champion Trailer sakal
Premier

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

Kartik Aaryan: 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अभिनेता कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.

priyanka kulkarni

Chandu Champion Trailer: भारताचे पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांच्या जीवनावर आधारित 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ट्रेलरमधील अभिनेता कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.

कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीची या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळते. चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनातील विविध टप्पे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन हा विविध लूकमध्ये दिसतो.

ट्रेलरची सुरुवात विजयराज यांच्या आवाजानं होते, ज्यामध्ये ते मुरलीकांत पेटकरची कथा सांगतात. भारतीय सैन्याचा भाग असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना युद्धादरम्यान 9 गोळ्या लागल्या होत्या. हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यातील काही भागाची झलक ट्रेलरमध्ये दिसते. ज्यात त्यांचा बालपणाबद्दल तसेच भारतीय सैन्यात भरती होण्यापासून ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

पाहा ट्रेलर

चित्रपटातील डायलॉग्स

1. 'मुरलीकांत पेटकर की कहानी आजाद हिंदुस्तान की कहानी है. हालात ऐसे थे कि देश टिक भी पाएगा या नहीं? पर हिंदुस्तान लड़ता है हर हालात से' या ट्रेलरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले. तसेच

2. 'भगवान से मेरा जो भी लेनदेन था मुझे ऐसा मारना उसके प्लान में ही नहीं था. वो दिन मैं तय किया मैं जिएगा और उसके लिए जितेना लड़ना पड़े मैं लड़ेगा. हर चिढ़ाती हुई हंसी को पलट के बोलेगा ..ए हंसता काए को है?' या ट्रेलरमधील डायलॉगला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खाननं केलं आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT