chetan vadnere new home  sakal
Premier

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने मुंबई नाही 'या' ठिकाणी घेतलं नवं घर; घराचं इंटेरिअर पाहून म्हणाल वाह

Payal Naik

Marathi Actor Buy New House: स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळेच दिवसरात्र मेहनत करत असतात. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. रोहित माने, धनश्री काडगांवकर, मंगेश देसाई, शिवाली परब, रुपाली भोसले अशा अनेक कलाकारांनी स्वतःच्या हक्काचं घर घेत चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केला. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरे याने नवीन घर घेतलं आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. त्याच्या घराचं इंटेरिअर पाहण्यासारखं आहे.

चेतन हा 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत शशांकच्या भूमिकेत दिसला होता. आता चेतनने मुंबईत नाही तर नाशिकमध्ये स्वतःचं घर घेतलं आहे. त्याने घराचा बिफोर आणि आफ्टर असा व्हिडिओ शेअर केला आहे. घर बांधायच्या आधी आणि नंतर असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच नव्या घराच्या दारावर लावलेली 'वडनेरे' नावाची नेमप्लेट सर्वांच लक्ष वेधून घेते. याला बाजूने फुलांची बॉर्डर करण्यात आलेली आहे. यानंतर चेतनच्या व्हिडीओमध्ये प्रशस्त हॉल, मॉर्डन किचन, बेडरुम यांची झलक पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये त्याच्या घराचं सुंदर इंटेरिअर पाहायला मिळतंय. इंटेरिअर पाहून नेटकरीही त्याचं कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं, 'घर हे माझे आनंदाचे, दाराशी सुरेख नक्षी…नाशिकचं नवीन घर Nashik New Home'. चेतनने एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली होती. लग्नाच्या बरोबर तीन महिन्यांनी नवीन घर घेत अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मेघना एरंडे, गिरीजा प्रभू अशा अनेक कलाकारांनी त्यांना नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर नेटकरीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT