Bigg Boss Marathi Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 Day 11 : कॅप्टन्सी गमावल्याने छोटा पुढारी झाला निराश ; "तुमचा मुलगा काही करू शकत नाही"

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चांगलाच गाजतोय. बिग बॉस मराठीच्या या पाचव्या पर्वात या आठवड्यात घरात 'कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन' हा पहिला टास्क पार पडला. या टास्कमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर विजयी झाली आणि 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. पण दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांचा राग अनावर झाला. घन:श्यामला खूप वाईट वाटतं.

घरातील सदस्यांचं सेलिब्रेशन

अंकिता कॅप्टन झाल्याच्या आनंदात तिला थेट उचलून डीपी दादांनी कॅप्टनच्या खोलीत नेलं. . तर अभिजीत तिच्यासाठी गाणं म्हणतो. यानंतर गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो.

छोट्या पुढारीला झालं दुःख

प्रोमोमध्ये 'छोटा पुढारी' घन:श्याम दरवडे धनंजय पोवारकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटत आहे. धनंजयकडे येऊन घन:श्याम म्हणतोय,"माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा 'बिग बॉस'मध्ये गेलाय कसा?". यावर घन:श्यामला समजावत धनंजय म्हणतो,"शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय माफता येणार?".

अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? निक्की, अरबाज आणि जान्हवी आता घरात नवीन काय खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पराभवाची हॅट्‌ट्रिक करायची असेल, तर राजन तेलींनी निवडणूक लढवावी'; दीपक केसरकरांचं थेट चॅलेंज

Latest Maharashtra News Updates Live : मुंबईत सर्वाधिक जागा भाजपला मिळणार?

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ मृत ब्राम्हणाला देणार जीवनदान ; प्रोमोची होतेय चर्चा

Chh.Sambhajinagar Assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात समस्यांचे बुरूज

Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

SCROLL FOR NEXT