kiran gaikwad  sakal
Premier

अरेंज मॅरेजमध्ये मुलीने केली फसवणूक, लग्न मोडल्याने नैराश्यात गेलेला किरण गायकवाड, म्हणतो- तिचं लग्न झालं पण मी..

Kiran Gaikwad On Depression: हा सगळा प्रकार 'चौक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला असल्याचं किरण गायकवाडने सांगितलं.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेता किरण गायकवाड याने 'देवमाणूस' या मालिकेतून घराघरात स्थान मिळवलं. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर किरण काही चित्रपटात झळकला. त्याच्या 'चौक' या चित्रपटातील भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं. आता तो 'डंका' या चित्रपटात झळकत आहे. या चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत किरणने त्याच्या आयुष्यातील एक अशी घटना सांगितली आहे ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. एका मुलीने अरेंज मॅरेजमध्ये त्याची फसवणूक केली होती. त्याचं लग्न अवघ्या ६ महिन्यात मोडलं होतं. वाचा नेमकं काय घडलं होतं.

किरणने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'माझं लग्न ठरलं होतं, हे आता सांगितलं पाहिजे की नाही मला माहीत नाही. पण ते अरेंज मॅरेज होतं आणि मी यानंतर काय करायचं हे नेमकं ठरवलं होतं. जशी सगळे स्वप्न बघतात तशी मी पण बघितली होती. हे माझं घर असेल, इथे आमच्या नवरा- बायकोची फ्रेम असेल अशा या सर्व माझ्या गोष्टी ठरल्या होत्या. लग्न ठरल्यापासून सहा महिन्यांचं आमचं नातं होतं. त्यामध्ये आम्ही दोन-तीन वेळा भेटलोही.'

याबद्दल बोलताना तो भावुक होत म्हणाला, 'अशातच मला एका व्यक्तीचा मेसेज आला. माझ्यासोबत डबल डेटिंगचा प्रकार घडला होता. त्यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. त्यावेळी माझ्या गोळ्याही सुरू झाल्या. ही गोष्ट अगदी अलिकडेच 'चौक' सिनेमाचं शुटिंग सुरू होतं तेव्हा झालेली. सुदैवाने काम सुरू असल्यामुळे मी त्या नैराश्यातून बाहेर येऊ शकलो. आता त्या मुलीचंं लग्नही झालं आणि मी ठरवलं की आता बास किती दिवस त्या आठवणीत आणि दुःखात राहणार. मग शेवटी मी यातून बाहेर पडलो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT