CID 2 Cast: तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'सीआयडी' CID. ही मालिका गाजली ती मालिकेचा विषय आणि मालिकेतील कलाकार यांच्यामुळे. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत ही टीमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या तिघांना आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. केसेस करण्यात पटाईत असलेले हे तिघे आपल्या टीमसोबत आणि डॉक्टर साळुंकेसोबत मिळून गुन्हेगारांच्या नाकात दम करायचे. २१ जानेवारी १९९८ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. मात्र आता हीच सीआयडी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार आहे असं सांगितलं तर? लवकरच सीआयडीचा सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी टीव्हीवर नुकताच त्यांचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे.
सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात एसीपी प्रद्युम्न हे भर पावसात पोलिसांच्या गाडीतून उतरताना दिसत आहेत. त्यांच्या हातात छत्री आहे आणि समोर आग जळतेय. तर त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्तींचेही डोळे दिसत आहेत. एकाच्या भुवयीवरून रक्तही वाहताना दिसतंय. आता हा टीझर पाहून नेटकऱ्यांनी सीआयडी परत येणार असल्याचा अंदाज लावलाय. सीआयडी च्या दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण दिसणार याची नेटकऱ्यांना उत्सुकता आहे. अशातच टीझरमध्ये दिसणाऱ्या दोन डोळ्यांवरून नेटकऱ्यांनी दोघांना ओळखलं आहे. व्हिडिओच्या सुरवातीलाच दयानंद शेट्टीचे डोळे दिसत आहेत. तर शेवटी अभिजितचे डोळे दिसत आहेत. त्यामुळे हे दोघे या सीझनमध्ये असणार हे नक्की.
मात्र सोनी टीव्ही २६ तारखेला आणखी एक व्हिडिओ शेअर करणार आहे. आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय सरप्राइज असणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आता खरंच सीआयडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार का हे पाहणं औसुक्याचं ठरत आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच सोनी मराठीवरही सीआयडीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला. कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा असे अनेक डॉयलॉग आता प्रेक्षकांना मराठी ऐकायला मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.