colors marathi serial esakal
Premier

दुसरा क्रमांक टिकवुन ठेवण्यासाठी कलर्स मराठीची नवी शक्कल; पुन्हा सुरू होणार गाजलेली मालिका, जाणून घ्या नाव आणि वेळ

Colors Marathi Old Serial Releasing Again: कलर्स मराठी सध्या टीआरपीच्या यादीत वरच्या स्थानावर जात आहे. अशातच आता वाहिनीने नवीन निर्णय घेत जुनी मालिका भेटीला आणली आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावर तीन मराठी वाहिन्यांमध्ये मुख्यतः टीआरपीची शर्यत दिसून येते. स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी या वाहिन्या आणि या वाहिन्यांवरच्या कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिले जातात. त्यात टीआरपी यादीत स्टार प्रवाह वाहिनी सगळ्यात वर आहे. मात्र गेल्या २ महिन्यात टीआरपी यादीत बरेच बदल दिसून आले. कलर्स मराठी वाहिनीने चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 'बिग बॉस मराठी ५' चा वाहिनीला बराच फायदा झाला. त्यासोबतच वाहिनीवरील नव्याने सुरू झालेले कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता आपला दुसरा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी कलर्सकडून आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. वाहिनीवर एक जुनी मालिका पुन्हा दाखवण्यात येणार आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड झाल्यापासून वाहिनीवर अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. काही जुन्या मालिका बंद होऊन त्यांची जागा नव्या मालिकांनी घेतली. 'बिग बॉस मराठी ५' मध्येही बरेच बदल पाहायला मिळाले. तर आणखीही नवीन मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा', 'अशोक मा मा', 'लय आवडतेस तू मला' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातच आता वाहिनीने आणखी एक निर्णय घेतला आहे. वाहिनीने इतर वाहिन्यांप्रमाणे दुपारीही मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कलर्स वाहिनीवरील 'घाडगे अँड सून' ही गाजलेली मालिका पुन्हा एकदा वाहिनीवर दाखवली जाणार आहे. मात्र ती संध्याकाळी नाही तर दुपारी दाखवली जाणार आहे. दुपारी एक वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे.

वाहिनीच्या या निर्णयाचं प्रेक्षकांनीही स्वागत केलं आहे. यासोबतच आणखीही काही जुन्या मालिका सुरू करण्याची मागणी आता प्रेक्षक करत आहेत. प्रेक्षकांनी काही नावंही सुचवली आहेत. कलर्सच्या या निर्णयाचा वाहिनीला नक्कीच फायदा होईल असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT