bigg boss marathi 5 contestants  
Premier

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसणार कलर्स मराठीवरील नायिका आणि खलनायिकेची जोडी, कोण आहेत त्या?

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' चा हा सिझन खास असणार आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. कार्यक्रमाच्या होस्ट पासून 'बिग बॉसच्या घरापर्यंत सगळंच बदललेलं आहे. या वेळेस घरात कोणकोणते कलाकार येतात हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. आता एका एका कलाकाराचा चेहरा समोर येत आहे. त्यात कलर्स मराठीवरील दोन अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. या कार्यक्रमात कलर्स मराठीवरील लोकप्रिय नायिका आणि खलनायिका दोघीही दिसत आहेत. कोण आहेत त्या?

'बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेणारी नायिका आहे 'जीव माझा गुंतला मधील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण. योगिताने मालिकेत अंतराचं मुख्य पात्र साकारलं होतं. आता ती बिग बॉस च्या घरात दिसणार आहे. पाच महिन्यांपूर्वीच योगिताना ऑनस्क्रीन पती असलेल्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधली होती. आता ती तीन महिन्यांसाठी बिग बॉसच्या घरात आली आहे. तर दुसरी अभिनेत्री आहे. 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील खलनायिका सोनिया म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेदार. या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता या दोघी एकमेकांच्या मैत्रिणी बनणार की शत्रू हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

तर यावेळेस बिग बॉसच्या घरात काहीही सोपं नसणार आहे. सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागणार आहे. तर ते पैसे त्यांना कमवावे लागणार आहे. त्यांना खाण्यासाठी आणि पाण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हा सिझन झक्कीच अवघड असणार आहे. यापूर्वी पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगावकर यांनी बिग बॉसच्या घरत एंट्री केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT