Dalljiet Kaur & Nikhil Patel : हिंदी टेलिव्हिजनवरील आघाडीची अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असणाऱ्या उलथापालथींमुळे चर्चेत आहे. तिचा केनियास्थित नवरा निखिल पटेलबरोबर सुरू असलेला तिचा वाद आता अजून चिघळला आहे. नुकतेच सोशल मीडियावर निखिलचे त्याच्या आताच्या गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर दलजीतने केलेली पोस्टही गाजतेय.
दलजीत कौरचा नवरा निखिल पटेल नुकताच त्याची कथित गर्लफ्रेंड सफिना नाझरसोबत भारतात परतला. टेली टॉक इंडिया या मीडिया पोर्टलने त्यांचे हॉटेलमध्ये चेक इन करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो कमी कालावधीत व्हायरल झालेच पण यामुळे निखिलला अनेकांनी ट्रोल केलं. तर निखिल अतिशय असंवेदनशील आहे असं म्हणत त्याच्यावर टीका केली.
निखिलच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर त्याची पत्नी आणि अभिनेत्री दलजित कौरनेही 'माझ्याकडे यावर बोलायला शब्द नाहीयेत. माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत आहेत' अशी प्रतिक्रिया इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे. याबरोबरच दलजीतने सोशल मीडियावर यावर एक पोस्ट शेअर केली आणि काही वेळातच डिलीट केली.
टेलीमसाला या चॅनेलने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. दलजित त्यात म्हणते कि,"गेल्या वर्षीच्या रात्री त्याचवेळेला मी तुझ्या सगळ्या कुटूंबाला एकत्र करून लंडनमधील एका एशियन रेस्टारंटमध्ये तुझ्यासाठी सरप्राईज डिनर प्लॅन केला होता. त्यानंतर तुझी पत्नी म्हणून मी खूप खुश होते. त्यानंतर आपण एका सरप्राइज लोकेशनवर राहण्यासाठी गेलो होतो, तिथे आपण तुझा वाढदिवस साजरा केला. ते लोकेशन शोधण्यासाठी जवळपास मी महिनाभर मेहनत घेत होते. आपल्या लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा निखिल. आज हे सगळं आठवून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. सगळेजण म्हणतात आता मी यातून बाहेर पडायला हवं पण मी यातून कशी बाहेर येऊ जेव्हा माझा नवरा माझ्या सगळ्या जखमा स्वतःच्या हातांनी उघडतोय. कदाचित मला हे कधीच हे समजणार नाही ते हे सगळं का आणि कशासाठी करतोयस ?
तू तुझ्या पीआर एजन्सी कडून सार्वजनिकरित्या पोस्ट केलेल्या तारखेच्या आधीच माझं सगळं सामान स्टोरेज स्टेशनला पाठ्वण्यापासून ते मी माझ्या भरल्या चुड्याने भिंतीवर बनवलेलं लाडकं पेंटिंग पुसून टाकून त्यावर 'सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फ**' या पुस्तकाचा फोटो टाकताना त्या भिंतीचा बॅकग्राउंडम्हणून वापरण्यापर्यंत तू जे मला दुःख पोहोचवण्याचे मार्ग शोधले आहेत त्यांनी मी खरंच चकित झाले आहे.
मला माहितीये तू हे सगळं इतक्या लवकरच थांबवणार नाहीस. तू लवकरच आणखी नवे मार्ग शोधशील.
ते जाऊ देत पण जेडन अजूनही तुला बाबा म्हणूनच हाक मारतो. माझ्या मुलाला ते विसरायला लावणं ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. तू माझ्याशी इतक्या थाटात लग्न केलंस कि माझ्या मुलासाठी तुझ्याप्रमाणे ती आठवण पुसून टाकणं खूप कठीण आहे.
एस एनमुळे अजून कोणती नोटीस मला मिळणार आहे का ? मला माहितीये तुझे पीआर मित्र यासाठी तयार असतील. "
दलजितची पोस्ट आणि निखिलचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी निखिलवर खूप टीका केली आहे. त्याला जर तिच्यापासून वेगळं व्हायचं आहे तर किमान त्याने तिच्या भावनांचा सन्मान करायला हवा असं अनेकांनी म्हंटलं आहे. तर अनेकांनी निखिलने भारतीय परंपरेची आणि भारतीय मुलीची फसवणूक केली आहे असं म्हंटल आहे. दलजितचे अनेक मित्रांनी तिला यात साथ दिली आहे. तर अभिनेत्री देबोलीना भट्टचार्जीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निखिलवर टीका केली आहे.
२०२३ मध्ये निखिल आणि दलजितचं लग्न झालं होतं पण लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच दलजित भारतात परतली. त्यानंतर तिने निखिलने तिची फसवणूक केल्याचा आरोप केला पण निखिलने त्यांचं लग्न बेकायदेशीर आहे असं म्हंटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.