Deepika Padukone Look Esakal
Premier

Anant Ambani & Radika Merchant Wedding : भांगात सिंदूर, लाल रंगाचा अनारकली ड्रेसमध्ये खुललं दीपिकाचं सौंदर्य ; अनंत-राधिकाच्या लग्नात गरोदर दीपिकाने वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukone : सध्या सगळीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा गाजतोय. या शाही विवाहसोहळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली. तर बॉलिवूडकर या सोहळ्यात आघाडीवर दिसले. पण सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अभिनेत्री दीपिका पदुकोणची. या लग्नात तिने केलेल्या लूकने आणि तिच्या सौंदर्याने सगळ्यांचं भुरळ घातली.

दीपिकाचं आरस्पानी सौंदर्य

अनंत-राधिकाच्या लग्नाला दीपिकाने लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये हजेरी लावली. गरोदर असलेल्या दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत होता. लाल रंगाचा अनारकली ड्रेस, भांगामध्ये सिंदूर, साजेल असा मेकअप, गळ्यात चोकर आणि त्याबरोबर शोभून दिसतील असे कानातले या दीपिकाच्या लूकवर अनेकजण फिदा झाले. तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं. दीपिकाचा या लूकमधील फोटोही चर्चेत आहे.

लग्नातील व्हिडीओ झाला व्हायरल

दीपिकाने लग्नसमारंभात तिच्या आईबरोबर प्रवेश केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक मीडिया पेजेसनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत दीपिकाच्या सौंदर्याचं कौतुक केलं. तिचा लूक अनेकांना पसंत पडला.

रणवीरचा धमाल डान्स

दीपिकाने जरी लग्नसोहळ्यात उशिरा हजेरी लावली असली तरीही तिचा नवरा रणवीर सिंहने सगळ्यात आधी हजेरी लावत अनंतच्या वरातीमध्ये धमाल डान्स केला. त्याच्या डान्सने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं. रणवीर स्वतः जबरदस्त नाचलाच पण त्याने स्वतःबरोबर इतर कलाकारांनाही नाचवलं. रणवीरने अनिल कपूर, सलमान खान, रजनीकांत यांनाही लग्नाच्या वरातीत नाच करायला लावला तर प्रियांका चोप्राचा नवरा निकला डान्स शिकवतानाही रणवीर पाहायला मिळाला. यावेळी मात्र सगळ्यांनी दीपिकाला मिस केलं.

अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा आज १२ जुलैला मुंबईच्या जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्याला मनोरंजन, क्रीडा, उद्योग, संगीत अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT