dharmaveer 3 review  esakal
Premier

Dharmaveer 2 Movie Review: ''हू इज एकनाथ शिंदे'' सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट !

Chinmay Jagtap

Dharmaveer 2 Latest Marathi Movie Review: गेल्या कित्येक महिन्यांपासून धर्मवीर दोन चित्रपटाविषयी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. धर्मवीर १च्या यशानंतर आणि त्यानंतर घडलेल्या महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घटनांनंतर 'धर्मवीर २' मध्ये नक्की काय असणार? धर्मवीर २ नक्की काय संदेश आपल्याला देणार ? हे जाणून घ्यायची संपूर्ण महाराष्ट्राला इच्छा होती. अखेर धर्मवीर २ रिलीज झाला आणि जे अपेक्षित होतं तेच ह्या चित्रपटातून पाहायला मिळालं.

आनंद दिघेंनी करुन ठेवलेले काम फार मोठे आहे. त्यांनी विविध माणसांना केलेली मदत सर्वश्रुत आहे. अशातच धर्मवीर चित्रपट आला आणि आनंद दिघे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. धर्मवीर २ मधून देखील तेच दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला आहे. मात्र या प्रयत्नात आनंद दिघे यांच्या पेक्षा एकनाथ शिंदेंच्या बंडा विषयी जास्त माहिती आपल्यासमोर येते हेच पाहायला मिळतं. मात्र ते कसं येतं हे पाहण्यात जी उत्सुकता आहे ना ती वेगळीच आहे. कारण ब्लॉकब्लस्टर हिंदी चित्रपटांना लाजवणारा भव्य दिव्य असा मराठी चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

प्रसाद ओक यांनी साकारलेले आनंद दिघे

प्रसाद ओक किती तगडा नट आहे आपण सगळे जाणतोच. मात्र एखादी व्यक्तिरेखा जिवंत करणं. आनंद दिघे वेळोवेळी मोठा पडदावर दिसणं. प्रसाद ओकला विसरून जाऊन आपल्यासमोर आनंद दिघेच उभे आहेत याचा भास वेळोवेळी होणं. याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आणि खऱ्या अर्थाने एखाद्या अभिनेत्याने एखादी भूमिका कशी वठवावी हे जाणून घ्यायचं असेल तर धर्मवीर 2 पाहिलाच हवा.

धर्मवीर १ मध्ये क्षितिज दाते यांनी साकारलेली एकनाथ शिंदे यांची भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. तर धर्मवीर २ मध्ये दाते यांनी एकनाथ शिंदे अक्षरशः जगले आहेत. एकनाथ शिंदे यांच बोलणं, एकनाथ शिंदे यांचे हातवारे, प्रत्येक गोष्ट योग्य त्या पद्धतीने निरीक्षण करून क्षितिज दाते यांनी तुफान असा अभिनय केला आहे.

आनंद दिघे पेक्षा एकनाथ शिंदेंना दिलेलं महत्त्व

धर्मवीर 2 हा चित्रपट शीर्षक बघता आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असावा अशी अपेक्षा करूनच लोक बघायला जातात. मात्र चित्रपटांमध्ये आनंद दिघे कमी तर एकनाथ शिंदेच जास्त दिसत आहेत. अशावेळी जर कोणतेही राजकीय पार्श्वभूमी माहीत नसेल आणि फक्त मनोरंजन म्हणून मराठी चित्रपट पहायला जायचे असेल तर आवर्जून बघायलाच हवा धर्मवीर २. इतर बाबींबद्दल बोलायचं तर चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम झालं आहे. चित्रपटातील गाणी फारशी लक्षात राहत नाही पण सिनेमॅटोग्राफीचं कौतुक करावं लागेल. तांत्रिक गोष्टी अतिशय उत्तम सांभाळण्यात आल्या आहेत. एक भव्यदिव्य चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

Katraj Dairy: कात्रज डेअरीकडून खुशखबर! दुधाच्या दरात शेतकऱ्यांना दोन रुपयांचा फरक मिळणार

Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता मलबा हटविण्यासाठी सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत राहाणार बंद!

बचत गटांमुळे गावागावांमधील अवैध खासगी सावकारीला लगाम! राज्यात 8 लाख बचत गटांमध्ये 73 लाख महिला; दरवर्षी 10500 कोटींचे कर्जवाटप; नियमित कर्जफेडीवर 100% व्याज सवलत

सासऱ्यांनी प्रेमविवाह केला, गावकऱ्यांचा संताप, पंचायतीने सुनेला धक्कादायक शिक्षा सुनावली, महाराष्ट्रातील घटना

SCROLL FOR NEXT