dharmveer 2
dharmveer 2  sakal
Premier

Dharmveer 2: सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय... 'धर्मवीर २'ची रिलीज डेट जाहीर, दुसऱ्या भागात नवीन काय?

Payal Naik

येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो 'धर्मवीर २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ देखील उपस्थित होते. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'धर्मवीर २' या चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसतात. 'हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही' अशी ओळही त्यावर नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे. मराठीसह हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित केला जाणार असल्याने 'धर्मवीर २' आता जगभरात पोहोचणार आहे. 'धर्मवीर' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता 'धर्मवीर २' पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल यात काहीच शंका नाही.

'धर्मवीर - २' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका लाजवाब होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

Rahul Dravid : विश्‍वविजेत्या संघाच्या माजी प्रशिक्षकांनी उलगडले यशाचे रहस्य

SCROLL FOR NEXT