dhruvi patel  esakal
Premier

Miss India 2024: धुव्री पटेलने जिंकला मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा किताब, पुढे काय करणार? म्हणाली-

Miss India Worldwide 2024 : ध्रुवी पटेल हिने मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४ हा किताब आपल्या नावावर केला आहे.

Payal Naik

Dhruvi Patel won the title of Miss India Worldwide 2024: मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 ब्युटी पेजेंट ही स्पर्धा भारताबाहेर भरवण्यात येणारी मोठी आणि सगळ्यात जास्त वेळ चालणारी स्पर्धा आहे. अनेक देश या स्पर्धेत सहभागी होतात. नुकतीच ही स्पर्धा न्यू जर्सी येथील एडिसन येथे पार पडली. या स्पर्धेत अमेरिकेची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने मिस इंडिया वल्डवाइड २०२४ चा किताब आपल्या नावे केला आहे. तिच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिने पुढे काय करणार यावर भाष्य केलं आहे. ध्रुवीला बॉलिवूड अभिनेत्री होण्याची इच्छा आहे.

ध्रुवी पटेल या अमेरिकेतील कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम्सच्या विद्यार्थिनी आहे. जर्सीतील एडिसन, येथे मिस इंडिया वर्ल्डवाइडची विजेती घोषित झाल्यानंतर ध्रुवी अत्यंत आनंदी आहे. “मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकणे हा एक अभूतपूर्व सन्मान आहे. हे मुकुटापेक्षा अधिक आहे. माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा देण्याची संधी यातून दर्शवली जाते. मला इथून पुढे बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न आहे. मला युनिसेफची ब्रँड एम्बॅसिडर होण्याची इच्छा आहे.” असं तिने सांगितलं.

कोण आहे ध्रुवी पटेल?

ध्रुवी ही अमेरिकेतील क्विनिपियाक विद्यापीठात संगणक माहिती प्रणालीची विद्यार्थीनी आहे. ध्रुवी इंस्टाग्रामवर खूप सक्रीय आहे, जिथे तिचे 18.6K फॉलोअर्स आहेत. यापूर्वी 2023 मध्ये तिने मिस इंडिया न्यू इंग्लंडचा ताज जिंकला होता. ती तिच्या घरातून 3DCharities नावाची एक ना- नफा संस्था चालवते आणि जवळच्या वरिष्ठ केंद्रात स्वयंसेवा करण्यासाठी, तसेच अन्न मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि गरज असलेल्या विविध कारणांसाठी निधी उभारणीसाठी मदत करते. शिवाय, ती नियमितपणे सुरू असलेल्या देणग्यांद्वारे युनिसेफ आणि फीडिंग अमेरिका सारख्या धर्मादाय संस्थांना योगदान देते .

‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ या स्पर्धेत अनेक स्पर्धक होत्या, मात्र त्या सर्वांना मागे टाकून ध्रुवीने विजेतेपदावर नाव कोरलं. सुरीनामच्या लिसा अब्दोएलहकला ‘फर्स्ट रनर अप’ घोषित करण्यात आलं, तर नेदरलँडच्या मालविका शर्माला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आलं.

‘मिसेस’ गटात त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुसान माउटेट विजेती, स्नेहा नांबियार ‘फर्स्ट रनर अप’ आणि ब्रिटनची पवनदीप कौर ‘सेकंड रनर अप’ ठरली. तर ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटला ‘टीन’ श्रेणीत ‘मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड’चा मुकुट देण्यात आला. नेदरलँडची श्रेया सिंग आणि सुरीनामची श्रद्धा टेडजो यांना अनुक्रमे ‘फर्स्ट’ आणि ‘सेकंड रनर अप’ घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT