diljit dosanjh on ratan tata esakal
Premier

रतन टाटांबद्दल समजताच दिलजीत दोसांजने मध्येच थांबवला कॉन्सर्ट; त्यांच्याबद्दल असं काही बोलला की ऐकून अंगावर काटा येईल

Payal Naik

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. प्रत्येक जण त्यांनी केलेल्या चांगल्या कामांचा दाखल देत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. उद्योगपतींसोबतच अनेक राजकारणी आणि कलाकार मंडळीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याला जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्याने त्याचा कॉन्सर्ट मध्येच थांबवला. त्यासोबतच तो असं काही म्हणाला की त्याचं बोलणं ऐकून सगळेच भावुक झाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जेव्हा दिलजीतला ही बातमी कळाली तेव्हा तो जर्मनीमध्ये कॉन्सर्ट करत होता.

दिलजीतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो रतन टाटा यांच्याबद्दल पंजाबीमध्ये बोलताना दिसतोय. तो म्हणतो, रतन टाटा यांना तुम्ही सगळेच ओळखता. काल त्यांचं निधन झालं. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली. रतन टाटा होणं सोपं नाहीये. त्यांचं नाव घेणं मला यासाठी गरजेचं वाटलं कारण त्यांचं आयुष्य पाहिलं तर त्यांनी नेहमीच मेहनत केली. मी आजवर फक्त त्यांच्याबद्दल ऐकलंय, वाचलंय. त्यांना मी कधी भेटलो नाहीये. पण मी कधी त्यांना दुसऱ्या कुणाबद्दल वाईट बोलताना नाही ऐकलं. नेहमी त्यानी आयुष्यात मेहनत केली, चांगलं काम केलं. कुणाच्यातरी कामी आले. हेच आयुष्य आहे, हेच जीवन आहे. त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो तर चांगला विचार करणं, कुणासाच्यातरी उपयोगी येणं. त्यांनी आयुष्यावर कुठलाही डाग पडू दिला नाही.'

दिलजीतचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. टाटा यांनी आयुष्यात हेच कमावलं असं म्हणत नेटकरी दिलजीत याच्या विचारांना पाठिंबा देत आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर सलमान खान, अजय देवगन यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: नवापुरात तिन्ही उमेदवारांमध्येच रंगणार लढत; उमेदवार तेच, मात्र पक्ष व चिन्ह बदलण्याची शक्यता

टीम इंडियाला Semi Final गाठण्यासाठी शेवटची संधी; पाकिस्तानची हवीय मदत, जाणून घ्या समीकरण

Amitabh Bachchan : कुली सेटवरील 'त्या' घटनेनंतर अमिताभ साजरा करतात दोनदा वाढदिवस, हनुमान चालीसेने वाचवलेले प्राण

Ladki Bahin Yojana : धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात 9 लाख `लाडक्या बहिणी`; 30 हजार महिला आधारकार्ड `लिंकिंग`अभावी वंचित

Noel Tata: टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड; 'टाटा सन्स'मध्ये 66 टक्के मालकी

SCROLL FOR NEXT