Akshay Kumar & Zeenat Aman  Esakal
Premier

Akshay Kumar & Zeenat Aman : झीनत अमान यांचा आगामी शो वादाच्या भोवऱ्यात ; अक्षयकुमारच्या नावाखाली टेलिव्हिजन अभिनेत्रीने फसवणूक केल्याचा निर्मात्यांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान त्यांचा आगामी शो शोस्टॉपर मुळे चर्चेत आहेत. ओटीटीवर लवकरच रिलीज होणाऱ्या शोबद्दल गेल्या काही महिन्यांपासून अनेक वादग्रस्त गोष्टी समोर येत आहेत. त्यातच टेलिव्हिजन स्टार दिगंगना सूर्यवंशीवर शोच्या दिग्दर्शकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचं समोर आलं आहे.

काय घडलं नेमकं ?

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, झीनत अमान यांचा आगामी शो 'शोस्टॉपर' चं बरंचसं काम पूर्ण झालं असून या शोमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांनाच ९०-९५ % मानधन पूर्ण करण्यात आल्याचं निर्माता आणि दिग्दर्शकांच्या टीमकडून सांगण्यात येतंय. पण त्यातच आता शोचे दिग्दर्शक मनीष हरिशंकर यांनी अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशीविरुद्ध निर्मात्यांनी कलम 420 आणि कलम 406 अंतर्गत फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दिगंगनाने निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची भेट घेऊन अक्षय कुमार या शोचा प्रस्तुतकर्ता म्हणून काम बोर्डवर आणण्यासाठी तयार करणार असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे तिने त्यांना एक एमओयू तयार करायला सांगितलं ज्यामुळे हा सगळा व्यवहार कायदेशीर होईल. त्यानंतर अक्षयकुमारने हा शो स्पॉन्सर करावा म्हणून ६ कोटी आणि अभिनेत्रीने हा करार करण्यासाठी निर्मात्यांकडून ७५ लाखांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, तिच्यासाठी मर्सिडीज जी क्लास आणि अक्षयचे सचिव वेदांत बाली यांना २५ लाख रुपये आणि नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांना १ कोटी रुपये देण्यात यावेत असं या व्यवहारात ठरलं होतं.

हा व्यवहार निश्चित झाल्यावर दिगंगनाने मनीष आणि त्यांच्या टीमला तिचं अक्षयशी आणि त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन व्यक्तींशी बोलणं या संदर्भात बोलणं झाल्याचं सांगितलं आणि या दोन व्यक्ती हा शो आधी बघणार असल्याचंही तिने उघड केलं. त्यानंतर दोन व्यक्तींनी मनीष यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांची भेट घेतली आणि अक्षयला हा शो बघायचा आहे असं सांगितलं.

त्यावेळी अक्षय अजमेरमध्ये शूटिंग करत होता म्हणून मनीष यांनी दिगंगनाबरोबर त्यांचा एक एडिटर अजमेरला जाऊन अक्षयची भेट घेईल अशी व्यवस्था केली. त्या एडिटरकडे एक आयपॅड देण्यात आला होता ज्यात सगळे एपिसोड्स देण्यात आले होते. एडिटर काही वेळासाठी अक्षयला भेटला पण त्यानंतर दिगंगनाने त्याच्याकडून आयपॅड घेतला आणि ती एकटीच सगळे एपिसोड अक्षयला दाखवण्यासाठी निघून गेली असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

दिग्दर्शकाने केलेल्या तक्रारीनुसार, तिने अजून सदर आयपॅड परत केला नसून अक्षयने शोचा प्रस्तुतकर्ता होण्यासाठी ६ कोटी रुपये आगाऊ मागितले असल्याचा दावा केलाय. जेव्हा दिग्दर्शकांनी तिच्याकडे त्यांना अक्षयशी बोलू द्यावं किंवा त्याच्याबरोबर एक मिटिंग करण्यात यावी अशी मागणी दिगंगनाकडे केली तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळेच त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे.

या व्यतिरिक्त हरिशंकर यांच्या वकील फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी दिगंगनाने मनीष यांच्याकडे एका मोठ्या रकमेची मागणी केली असून हा व्यवहार नगद स्वरूपात व्हावा आणि जर पैसे मिळाले नाही तर गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल अशी धमकी दिल्याचंही सांगितलं. याबद्दलही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलीस त्यावर योग्य ती कारवाई करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात माहिती घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला असताना तिने कोणत्याही प्रकारे उत्तर न दिल्याचं म्हंटलं आहे.

दरम्यान, दिगंगनाने एकता कपूरच्या 'क्या हादसा क्या हकीकत' या शोमधून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. यानंतर तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय तिने गोविंदा आणि वरुण शर्मा यांच्या फ्रायडे या सिनेमातही काम केलं होतं तसंच ती आता तेलुगू सिनेसृष्टीतही काम करतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT