आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग)चा यंदाचा सीजनही गाजतो आहे. टी-२० क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर भारतात सुरु असणारी ही क्रिकेट स्पर्धा आता जगभर गाजतेय आणि आता याच आयपीएलवर आधारित एक सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अतिशय वेगळं कथानक आणि स्क्रीनप्लेसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक जयप्रद देसाई २०२२ साली गाजलेल्या बनावट आयपीएल घोटाळ्यावर सिनेमा बनवत आहेत. वेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे बनवणारा दिग्दर्शक अशी जयप्रद यांची ओळख इंडस्ट्रीत आहे.
२०२२ साली गुजरातमध्ये एका गँगने फेक आयपीएल स्पर्धा आयोजित करून अशा क्रिकेट स्पर्धांवर पैसे लावणाऱ्या रशियन लोकांना फसवलं होतं. या स्पर्धांच्या उपांत्य फेरी अगोदर पोलिसांना ही बातमी कळली आणि त्यांनी ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या टोळीला अटक केली होती. संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या या घोटाळ्यावर आधारित सिनेमा जयप्रद देसाई बनवत आहेत.
सध्या या सिनेमाच्या कथेवर काम सुरु असून फराज हसन यांचं गाजलेलं पुस्तक 'फर्स्ट कॉपी' यावर हा सिनेमा आधारित असेल. अब्बास दलाल आणि हुसैन दलाल या सिनेमाची पटकथा लिहिणार आहेत. सिनेमाच्या कथानकावरूनच हा सिनेमाचं थ्रिलिंग असेल असा अंदाज नेटकरी बांधत आहेत.
लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरु होणार असून या सिनेमात कोणते कलाकार काम करणार हे अजून सिनेमाच्या टीमने जाहीर केलं नाहीये. सिनेमाची टीम या सिनेमाची जोरदार तयारी करत असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं म्हंटलं जातंय. पण अजूनही या सिनेमाबाबतची आणखी महत्त्वपूर्ण माहिती सिनेमाच्या टीमने दिली नाहीये. अतिशय वेगळ्या कथानकावर आधारित असणारा हा सिनेमा पाहायला प्रेक्षक उत्सुक असतील हे मात्र नक्की
जयप्रद यांनी आजवर बऱ्याच सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. नागरिक या मराठी सिनेमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. सचिन खेडेकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. त्यानंतर त्यांनी 'मुखबीर','कौन प्रवीण तांबे','फिर से आयी हसीन दिलरुबा' या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्यांचा 'फिर से आयी हसीन दिलरुबा' हा सिनेमा चर्चेत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.