R Madhavan Esakal
Premier

R Madhavan : जेव्हा माधवन करायचा दियाचा पाठलाग ; अजूनही 'ते' प्रसंग आठवून दिया घाबरते

अभिनेत्री दिया मिर्झाने तिची आर माधवनसोबतच्या सिनेमाची खास आठवण एका मुलाखतीत शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

आर माधवन आणि दिया मिर्झाची मुख्य भूमिका असलेला 'रहना है तेरे दिल में' हा सिनेमा आठवतो का? २०००च्या दशकात हा सिनेमा खूप गाजला होता. सुरुवातीला फ्लॉप ठरलेला हा सिनेमा माऊथ पब्लिसिटीमुळे सुपरहिट झाला.

या सिनेमात माधवनने मॅडी ही भूमिका साकारली होती तर दिया रीना या भूमिकेत होती. तर दियाने या सिनेमाविषयीची एक खास आठवण एका मुलाखतीमध्ये तिने शेअर केली.

सिनेमातील सीन बाबत दियाने केला खुलासा

एका जुन्या मुलाखतीमध्ये दियाने सिनेमाविषयी एक खुलासा केला. ती म्हणाली, जेव्हा सिनेमाच्या सीनसाठी माधवन तिचा पाठलाग करायचा तेव्हा दियाला खूप अस्वस्थ वाटायचं. या पात्राची भीती अजूनही वाटते. अजूनही कधी तिने त्या भूमिकेविषयी विचार केला कि तिला अस्वस्थ वाटलं. या पात्राचा खूप गहिरा परिणाम तिच्यावर झालाय. ती त्यावेळी हे फक्त रीना बाबत होतंय असं समजायची आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची.

इतकंच नाही तर दियाने असंही सांगितलं कि, माधवनने साकारलेली भूमिका सगळ्यांना आवडली कारण तो तो कसाही असला तरीही त्याची आयुष्य जगण्याची मूल्य खूप चांगली होती.

सिनेमाचं कथानक आणि कास्ट

हा सिनेमा एक लव्ह ट्रँगल होता. मॅडी रीना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो पण रीनाचं आधीच एका मुलाशी लग्न ठरलं असतं. तेव्हा मॅडी तिचा भावी नवरा म्हणून तिला भेटतो आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हाच तिच्या खऱ्या जोडीदाराची एंट्री होते अशी कथा होती.

सैफ अली खानने यात दियाच्या भावी नवऱ्याची भूमिका साकारली होती.

माधवनची कारकीर्द

आर माधवनने इंफर्नो, नथिंग भट लाईफ या सिनेमांमध्ये काम केलं तर त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत. नुकताच त्याचा शैतान हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमातील त्याच काम गाजलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT