ED summons YouTuber Elvish Yadav money laundering case for questioning Snake venom rave party  
Premier

ED Summons Elvish Yadav : युट्यूबर एल्विश यादव पुन्हा अडचणीत; ईडीने चौकशीसाठी बजावले समन्स

ED summons YouTuber Elvish Yadav in money laundering case : यादव याच्याविरोधात उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथील पोलिस ठाण्यात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा


लखनौ : प्रसिद्ध युट्यूबर सिद्धार्थ ऊर्फ एल्विश यादव याला सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समन्स बजावले आहे. यादव याला २३ जुलै रोजी ईडीच्या लखनौ येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यादव याने आयोजित केलेल्या रेव्ह पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थ म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.

यादव याच्याविरोधात उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथील पोलिस ठाण्यात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत ‘ईडी’ने यादवविरोधात मे महिन्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादव याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते मात्र, व्यावसायिक कामासाठी परदेश दौऱ्याचे कारण देत यादव याने चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविले होते, त्यामुळे त्याला आता २३ जुलै रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

एल्विश यादव याचा सहकारी राहुल यादव याची देखील या प्रकरणी चौकशी झाली आहे आणि गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे ईडीने सांगितले.
यादव याच्यावर अमलीपदार्थ आणि नशा उत्पन्न करणारे पदार्थ विरोधी कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला याला १७ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

Accident: खोपोलीजवळ बस अन् टेम्पोचा मोठा अपघात, ९ जण जखमी

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

SCROLL FOR NEXT