जर तुम्ही मराठी कुटुंबात जन्माला आले असाल तर तुमच्यावर लहानपणापासून सावरकरांचे विचार, त्यांचे संस्कार हे केले जातातच. महाराष्ट्रात असे कित्येक घरं आहेत त्या घरांमध्ये माझी जन्मठेप, 57 चा लढा ही सावरकरांची पुस्तक सर्रासपणे पाहायला मिळतात. मात्र आजची पिढी पुस्तकं वाचत नाही. तर सावरकर त्यांना समजायचे कसे? असा प्रश्न कित्येकांना पडतो. याचा एक उत्तम पर्याय म्हणजे 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट
सशस्त्र क्रांतीचा सखोल अभ्यास, गांधी विरुद्ध सावरकर वैचारिक युद्ध, अंदमानच्या काळापाणी येथे क्रांतिकाऱ्यांना भोगावा लागलेला त्रास. लंडनमध्ये सावरकरांनी जाऊन केलेला अभ्यास. इंडिया हाऊस मध्ये केलेले कार्य. अभिनव भारतासाठी दिलेले बलिदान.
मार्सेलिस बेटावर समुद्रात बोटीतून घेतलेली उडी. अंदमानच्या जेलमधून लिहिलेला माफी नामा, सावरकरांनी लिहिलेलं केलेलं कार्य सर्व अशा सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न या एका चित्रपटातून करण्यात आले आहे. असं जरी असलं तरी सावरकरांचे कार्य हे एका चित्रपटात मावेल इतकं लहान नसल्याने या चित्रपटाचे दोन भाग झाले असते असं चित्रपट पाहताना वाटतं
सावरकरांच्या जीवनातील या सर्व महत्त्वाच्या घटना तीन तासांमध्ये बसवणं अतिशय कठीण कार्य होतं. हे कार्य करण्याचा एक चांगला प्रयत्न दिग्दर्शक म्हणून रणदीप हुड्डा यांनी जरी केला असला तरी त्यांना हे संपूर्णपणे जमलं आहे असं वाटत नाही. चित्रपट दाखवताना जरा घाई झाली आहे असंच वाटतं. मात्र हा संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना खेळवून ठेवतो. प्रसंगी प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आणतो. ही देखील वस्तुस्थिती आहे
ने मझ सी ने परत मातृभूमीला हे गाणं चित्रपटाच्या ज्या टप्प्यावर आणलंय त्याला दिग्दर्शक म्हणून रणदीप हुड्डा यांना पैकीच्या पैकी गुण द्यायलाच हवेत.मात्र सावरकरांचा शब्दसाठा किती मोठा होता हे आपल्याला ज्ञात आहेच. त्यांनी तर कित्येक नवे शब्द मराठी भाषेला दिले आहेत. अशावेळी सावरकरांच्या चित्रपटांमध्ये असलेली गाणी ही सावरकरांच्या शब्दांना न्याय देणारी असली हवी होती. मात्र गाणी ऐकायला गेलो तर गाणी नाही तर फक्त निराशाच ऐकू येते.
सावरकरांच हिंदुत्व नक्की काय होतं, सावरकर मुसलमान दृष्टे होते का? असे कित्येक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाहीत. जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. सावरकरांची क्रांतिकारी विचारधारा नक्की कशी होती. हे देखील तुम्हाला या चित्रपटाला नक्कीच समजेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका जगला आहे. प्रत्येक सिनमध्ये त्याने स्वतःला झोकुन दिलं आहे. अख्ख्या चित्रपटात आपल्याला फक्त सावरकरच दिसतात. रणदीप हुड्डा कुठेही दिसत नाही.अंकिता लोखंडेचा अभिनय अगदीच तोड आहे. तर बाबारावांची भूमिका, सावरकरांच्या लहान भावाची भूमिका, मदनलाल ढिंगरा यांची भूमिका, मॅडम कामा यांची भूमिका, कालापाणीचा जेलर बारी साहेब याची भूमिका, अगदी बघण्यालायक आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवणं अतिशय कठीण होतं मात्र या काळाच्या केलेल्या अभ्यासामुळे तो काळ अक्षरशः आपल्यासमोर उभा राहतो. असं जरी असलं तरी संपूर्ण चित्रपटामध्ये झालेली घाई या चित्रपटासाठी एक वाईट बाब आहे.
अशावेळी जर तुम्हाला वीर सावरकरांविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील. सावरकरांचे हिंदुत्व काय होत? हे जाणून घ्यायचं असेल गांधी आणि सावरकर यांच्यातला वाद नेमका काय होता आहे जाणून घ्यायचं असेल, खरंच सावरकरांना मुसलमानांविषयी तिरस्कार होता का हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही वीर सावरकर हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.