Family Star Box Office Collection esakal
Premier

Family Star Box Office Collection: मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडाच्या केमिस्ट्रीने मनं जिंकली; 'फॅमिली स्टार'ने दोन दिवसांत केली एवढी कमाई

Family Star Box Office Collection: 'फॅमिली स्टार' हा चित्रपट 5 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर फॅमिली स्टार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत.

priyanka kulkarni

Family Star Box Office Collection Day 2: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा 'फॅमिली स्टार' हा चित्रपट 5 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर फॅमिली स्टार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत. या चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. चित्रपटातील मृणाल आणि विजय यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

'फॅमिली स्टार' ची स्टार कास्ट

'फॅमिली स्टार' या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबतच दिव्यांशा कौशिक, अजय घोष आणि मारिसा रॉड गॉर्डन यांनी देखील काम केलं आहे. मृणाल ठाकूरचा हा तिसरा तेलुगू चित्रपट आहे. याआधी तिने 'है नन्ना' आणि 'सीता रामम' मध्ये काम केले होते. या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. परशुराम यांनी फॅमिली स्टार या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटाचं कथानक

'फॅमिली स्टार' या चित्रपटाचं कथानक गोवर्धन नावाच्या मुलावर आधारित आहे. विजय देवरकोंडा यांनी गोवर्धनची भूमिका साकारली आहे. गोवर्धन हा एक मध्यमवर्गीय मुलगा आहे जो संपूर्ण जबाबदारी उचलत आहे. मृणाल ठाकूर इंदुमतीच्या भूमिकेत दिसत आहे, जी विद्यार्थिनी आहे. इंदूला भेटल्यानंतर गोवर्धनचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. गोवर्धन आणि इंदुमती यांच्या आयुष्यात कोण-कोणत्या घटना घडतात? हे पाहण्यासाठी तुम्हाला 'फॅमिली स्टार' हा चित्रपट बघावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT