Farah Khan
Farah Khan Esakal
Premier

Farah Khan : शूटिंगमध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला आणि 'ते' दृश्य बघून स्पॉटबॉय बेशुद्ध पडला

सकाळ डिजिटल टीम

Jo Jeeta Wohi Sikandar : बॉलिवूडमधील आघाडीची कोरियोग्राफर, दिग्दर्शिका फराह खान तिच्या बिनधास्त स्वभावामुळेही चर्चेत आहे. फराहने आजवर अनेक सुपरहिट गाणी कोरियोग्राफ केली आहेत. अनेक मुलाखतींमध्ये ती तिने कोरियोग्राफ केलेल्या गाण्यांचे किस्से शेअर करत असते. नुकताच तिने एका मुलाखतीत जो जिता वही सिकंदर सिनेमातील गाण्याचा खास किस्सा सगळ्यांना सांगितला.

फराहने नुकतीच 'रेडिओ नशा' च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने जो जिता वही सिकंदर सिनेमातील पूजा बेदी आणि स्पॉटबॉयमध्ये घडलेला प्रसंग शेअर केला. पहला नशा हे गाणं सरोज खान कोरियोग्राफ करत होत्या पण काही कारणामुळे त्यांना जमलं नाही तेव्हा फराहने ते गाणं कोरियोग्राफ केलं. हा प्रसंग सांगताना ती म्हणाली कि,"जो जिता वही सिकंदरमधील ते गाणं सरोज जी कोरियोग्राफ करणार आहेत हे सगळ्यांना माहित होतं. मग काहीतरी घडलं आणि त्यांना श्रीदेवी का माधुरीबरोबर गाणं शूट करण्यासाठी मुंबईला यावं लागलं आणि आम्ही उटीला होतो. त्या निघून गेल्या त्या काही परत आल्या नाहीत मग मी काही शोसाठी कोरियोग्राफी त्यावेळी करायचे. मग ही जबाबदारी माझ्यावर आली. दिग्दर्शक मन्सूर खानने मला बोलवलं शूटिंग ने केल्यामुळे त्यांचे पैसे बुडत आहेत तर मी पहिलं ते गाणं शूट करावं असं त्यांनी सुचवलं आणि मग ते गाणं मी कोरियोग्राफ केलं. "

गाण्याची गंमतीशीर आठवण

या गाण्याची आठवण सांगताना फराहने सांगितलं कि, तिने दिग्दर्शकाकडे एक दिवसाचा वेळ मागितला आणि राहिलेले शॉर्ट्स एकत्र जोडून तिने हे गाणं बसवलं. तिने या गाण्यात स्लो मोशन आणलं. इतकंच नाही तर फराहने पूजा बेदीला मर्लिन मुनरोच्या गाजलेल्या पोझमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला. तिने पूजाला एका कारवर उभं राहायला सांगितलं आणि एका स्पॉटबॉयच्या हातात पंखा देऊन पूजाला तिचा स्कर्ट उडताच पकडायला सांगितला. पहिल्या टेकमध्ये पूजा तिचा उडणारा स्कर्ट पकडायला विसरली आणि स्कर्ट जोरात उडाला आणि खाली पंखा घेऊन बसलेला स्पॉटबॉय ते दृश्य पाहून बेशुद्ध पडला. तेव्हा पूजाने थाँग (एकप्रकारचे स्विमवेअर) घातलं होतं. फराहनेही ते पहिल्यांदा पाहिलं. पूजा मात्र हे सगळं घडलं तेव्हा बिनधास्त होती. तिला या प्रकाराचं काहीच वाटलं नाही.

फराहने कोरियोग्राफ केलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. आमिर खान आणि पूजा बेदीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : नवाब मलिकांच्या बाबतीत अजित पवार ठाम? प्रश्न विचारताच म्हणाले, तुम्हाला काय त्रास...

Crime: 'तू दुसऱ्याच्या दुकानातून सामान कसा खरेदी केलास?'; किराणा दुकानदाराने ग्राहकाचा केला खून

Nithin Kamath: सेबीच्या नव्या नियमांमुळे शेअर बाजाराची व्यवस्थाच बदलणार, शून्य ब्रोकरेजचे युग संपणार?

Maharashtra Live News Updates : 'या' फ्लाइटने टीम इंडिया देशात परतणार

Team India Return: वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात येण्याचं शेड्युल पुन्हा बदललं, जाणून घ्या खेळाडू कधी परतणार?

SCROLL FOR NEXT