Why Did Fighter Flop Akshay Oberoi Shares Real Reason| Hrithik Roshan Deepika Padukone sakal
Premier

Fighter: हृतिक - दीपिका असतानाही चित्रपट फ्लॉप का ठरला? अभिनेत्यानेच दिलं खरं उत्तर

Fighter: हृतिक - दीपिका असतानाही चित्रपट फ्लॉप का ठरला? अभिनेत्यानेच दिलं खरं उत्तर | Why Did Fighter Flop Akshay Oberoi Shares Real Reason| Hrithik Roshan Deepika Padukone

सकाळ वृत्तसेवा

मुलाखतकार - मयूरी गावडे

अक्षय ओबेराॅय

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा फायटर हा चित्रपट यावर्षीच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये हृतीक रोशन आणि् दीपिका पदुकोण यांच्याबरोबरच अभिनेता अक्षय ओबेराॅय याचीही भूमिका महत्त्वपूर्ण होती. आता हा चित्रपट स्टार गोल्ड या वाहिनीवर येत्या १५ आॅगस्ट रोजी दाखविला जाणार आहे. त्यानिमित्त अक्षयशी साधलेला संवाद...

फायटर चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी टीव्हीवर प्रदर्शमित होत आहे. या चित्रपटाबाबत तुझ्या मनात किती उत्सुकता आहे...?

- फायटर चित्रपट माझ्या खूप जवळ आहे. या चित्रपटामुळेच मला ओळख मिळाली, असं मी नक्कीच म्हणू शकतो. हा चित्रपट एअर फोर्सवर आधारित आहे आणि त्यातच आपल्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट टीव्हीवर येतोय त्याचा आनंद खूप होत आहे. त्यातही स्टार गोल्डसारख्या मोठ्या वाहिनीवर म्हणजे आता घरोघरी तो पोहोचणार आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि या चित्रपटामुळेच मला मोठमोठे प्रोजेक्ट आॅफर झाले. ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. आता हा चित्रपट टीव्हीवर संपूर्ण कुटुंबे पाहतील. यासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे.

ः जेव्हा तुला समजलं की तू या चित्रपटाचा एक भाग आहेस तेव्हा तुझ्या नेमक्या काय भावना होत्या?

-

मी यापूर्वी ममता आनंद आणि सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत एक शो केला होता. त्यामध्ये मी एका व्हिलनची भूमिका केली होती. पण तो शो खूप लोकांनी नाही पाहिला. पण त्यावेळी मला ममता आनंद यांनी फोन केला आणि त्या म्हणाल्या, की त्यांना माझ्यासोबत काम करताना खूप मज्जा आली आणि त्यांना माझ्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल. त्यावेळी त्यांनी मला आश्वासन दिले होते की त्या मला पुन्हा काम देतील. पण आपली इंडस्ट्री अशी आहे की सिद्धार्थ आनंद असतील किंवा ममता आनंद असतील, त्यांच्यासारख्या मोठ्या माणसांसोबत सहजासहजी काम करण्याची संधी नाही येत. त्यानंतर बरोबर एका वर्षानंतर मला ममता यांचा कॉल आला आणि त्यांनी मला फायटर चित्रपटाविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, की असा असा एक रोल आहे. तू ये स्क्रीप्ट वाच, जर तुला पटत असेल तर आपण काम करू. त्यावेळी मी त्यांना फोन ठेवण्याआधीच सांगितलं की मी हे काम करतोय. जो काही रोल असेल, मी तो करायला तयार आहे. मी येऊन स्क्रीप्ट वाचेन, पण मी तयार आहे आणि तो दिवस माझ्या बेस्ट दिवसांपैकी एक होता. त्यावेळी मला समजलं की मी या चित्रपटाचा एक भाग आहे. हा चित्रपट माझ्या करिअरला वेगळी कलाटणी देईल असे मला वाटले. कारण हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधाी मला मिळणार होती. मग एखाद्या अभिनेत्याला आणखीन काय हवे...चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझ्या कामाचे कौतुक झाले. इतक्या वर्षांच्या मेहनतीचं मला त्याचं फळ मिळालं. या चित्रपटामध्ये मी स्क्वाड्रन लीडर बशीर खानची व्यक्तिरेखा साकारली आहे.

अनेक चित्रपट हिट होतात तर काही फ्लॉप होतात. तुझ्या मते चित्रपट हिट होण्याची व्याख्या काय आहे?

बदलत्या काळानुसार यश व अपयशाच्या व्याख्यादेखील बदलल्या आहेत आणि या मागे कुठेतरी आपणही कारणीभूत आहोत. प्रत्येक वेळी आपण सिनेमाच्या पोस्टरवर २०० करोड, ४०० करोड, ६०० करोड अशा किमती छापल्या जातात. अनेक मीडिया रिपोर्टस असे असतात की , या चित्रपटाने एवढ्या एवढ्या कोटींचा पल्ला पार केला आहे. म्हणजे त्या चित्रपटाने व्यावसायिक पातळीवर किती बिझनेस केला यावरून तो चित्रपट हिट आहे की फ्लॉप आहे हे ठरवलं जातं. हे मला व्यक्तिशः अजिबातच पटत नाही. माझ्यासाठी हे यश नाहीये. मला वाटतं की कोणता चित्रपट हिट आहे हे तो चित्रपट किती आठवडे थिएटर्समध्ये चालतो. यावर त्याचे यश अवलंबून असतं. सोबतच मला असंही वाटतं की, एखादी फिल्म थिएटर्स मध्ये नाही चालली, जास्त पैसे नाही कमावू शकली. पण त्या चित्रपटाची नंतर खूप चर्चा होते. जसं की अलीकडेच प्रदर्शित झालेला 'लापता लेडीज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढे पैसे नाही कमावू शकला. परंतु त्या चित्रपटाची चर्चा खूप झाली. हा माझ्यासाठी खरा सक्सेस आहे. आधीच्या काळात आपण चित्रपट हिट झाला की नाही याचे मोजमाप अशाच पद्धतीने करायचो.म्हणजे सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली... त्याला लोकांची किती पसंती मिळाली, या गोष्टींवर अवलंबून असायचे. पण दुर्दैवाने सध्या सगळेच चित्र बदलले आहे. हल्ली शंभर करोड..दोनशे करोड यावर चित्रपट यशस्वी झाला आहे असे मानले जात आहे.

बऱ्याचदा आपल्या कामात आपल्याला अपयश येते. त्यावेळी एक कलाकार म्हणून तुझ्या मनात काय विचार येतो..?

खरं सांगू तर मला आता अपयशाची सवय झाली आहे कारण माझे अधिक चित्रपट फ्लॉप झालेले आहेत. त्या चित्रपटातील माझे काम उत्तम होते. परंतु बाॅक्स आॅफिसवर ते चित्रपट अपयशी ठरले. माझा पिझ्झा चित्रपट चांगला होता. तसेच गुडगाव या चित्रपटातील माझी भूमिका छान होती. कालाकांडी, फितूर, लाल रंग या चित्रपटातील भूमिकाही माझ्या खास होत्या. परंतु प्रेक्षकांनी या चित्रपटांना फारशी पसंती दिली नाही. या सगळ्यामुळे अपयश हे माझ्या सवयीचा भाग झाला आहे. पण याचा मी जास्त विचार करत नाही बसत. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. मला असं वाटतं की मी त्या अपयशाला कवटाळून न बसता माझं काम करत राहिलो म्हणूनच मला फायटर सारखी फिल्म मिळाली. ज्याने मला यश मिळालं. स्वतःची एक ओळख निर्माण झाली आणि हे तेच काम आहे ज्याने माझं आयुष्य बदलून गेलं.

तुझ्या आगामी चित्रपटांविषयी काय सांगशील?

-

येत्या काळात माझे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. धर्मा प्रॉडक्शनसोबत माझा सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा एक राॅम-कॉम चित्रपट येणार आहे. ज्यामध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर यांच्यासारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की त्यांना धर्मा प्राॅडक्शनसोबत काम करायचे असते आणि मला ती संधी मिळाली आहे. खूप छान फिल्म आहे की, जी लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.आणि आशा आहे लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. त्या सोबतच साऊथची अजून काही चित्रपट आहेत जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT