Heeramandi The Diamond Bazar : भव्य सेट्स, दिव्यांचा झगमगाट, शाही अलंकार ही संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्टसची खासियत. त्यांचं दिग्दर्शन असलेली पहिली वेबसिरीज हिरामंडी द डायमंड बझार खूप चर्चेत आहे. सध्या सगळीकडे गाजत असलेल्या या वेबसीरिजसाठी कलाकारांनी घेतलेलं मानधन आणि या वेबसीरिजसाठी आलेला खर्च याविषयी जाणून घेऊया.
मनी कंट्रोल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अतिशय भव्य दिव्य असलेल्या या वेबसीरिजसाठी संजय यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. सिनेमाचं कथानक, कलाकारांचे पोशाख हे सगळं चर्चेत आहेच पण यासोबतच या साठी कलाकारांनी घेतलेलं मानधनही सगळ्यांना चक्रावणारं आहे. खुद्द संजय यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित करण्यासाठी ६० ते ७० करोड रुपये इतकं मानधन घेतलं आहे. तर या वेबसीरिजसाठी संजय यांना तब्बल २०० करोड रुपये खर्च आहे.
या वेबसीरिजमध्ये मल्लिकाजान ही भूमिका साकारणाऱ्या मनीषा कोईरालाने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे तर बिब्बोजान या भूमिकेमुळे सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अदिती राव हैदरीने एक ते दीड कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हंटलं जातंय.
फक्त दोन एपिसोडमध्ये दिसलेल्या रिचा चड्ढाने तिला मिळविलेली लाजवंतीची भूमिका खूप तन्मयतेने साकारली. अतिशय हिट झालेल्या या भूमिकेसाठी रिचानेही एक कोटी मानधन फक्त दोन एपिसोडसाठी घेतल्याचा अंदाज आहे.
रेहाना आणि मल्लिकाजानची धाकटी बहीण वहिदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संजिदा शेखला ४० लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.
तर मल्लिकाजानच्या धाकट्या मुलीची आलमजेबची भूमिका साकारणाऱ्या शर्मिन सेहगलने ३० लाख रुपये मानधन घेतलं आहे.
सगळ्यात जास्त मानधन घेतलंय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने. रेहाना आणि फरीदान ही भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीने दोन कोटी रुपये मानधन घेतलंय तर बऱ्याच काळाने बॉलिवूडमध्ये कमबॅक करणाऱ्या फरदीन खानने नवाब वली बिन झायेद-अल मोहम्मद या भूमिकेसाठी ७५ लाख रुपये मानधन घेतलं.
याशिवाय या सीरिजमध्ये कलाकारांनी वापरलेले दागिने अस्सल असल्याचं म्हंटलं जातंय. तर कलाकारांनी वापरलेले पोषाखही खास त्या काळानुसार डिझाईन करण्यात आले होते. सध्या वेबसीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतेय. शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा शाह बदुशा, फरीदा जलाल आणि श्रुती शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. परंतु या कलाकारांनी किती मानधन घेतलं त्याचा आकडा अजून समोर आला नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.