Popular actor in Game Of Thrones series passed away 
Premier

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Popular actor in Game Of Thrones series passed away : गेम ऑफ थ्रोन्स या सीरिजमध्ये काम करणाऱ्या दिग्गज कलाकाराचं निधन झालं. सोशल मीडियावर त्यांचे सहकलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ डिजिटल टीम

गेम ऑफ थ्रोन्स (Game Of Thrones) या गाजलेल्या सिरीजमध्ये केव्हन लॅनिस्टर ही गाजलेली भूमिका साकारणारे ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते इयान गेल्डर (Ian Gelder) यांचं ६ मे २०२४ ला वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं. पित्ताशय नलिकेच्या कॅन्सरमुळे ते गेला बराच काळ आजारी होते. त्यांचा पार्टनर बेन डॅनियल्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी जाहीर केली.

बेनची पोस्ट:

"माझे पती आणि आयुष्याचे जोडीदार इयान गेल्डर यांचं निधन झाल्याचं मी अतिशय दुःखी मनस्थितीत जाहीर करतो आहे. इयान यांना पित्ताशय नलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान डिसेंबर मध्ये झालं होतं आणि काल दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. त्यांची काळजी घेण्यासाठी मी माझं सगळं काम थांबवलं होतं पण आमच्या दोघांपैकी कुणालाही कल्पना नव्हती कि हे सगळं इतक्या चटकन होईल. ते कायमच माझ्यासाठी खंबीरपणे उभे राहिले आणि आम्ही जवळपास ३० वर्षं एकत्र होतो. जर आम्ही एकत्र राहत नसलो तर आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात असायचो. ते खूप दयाळू, उत्साही आणि प्रेमळ व्यक्ती होते. ते खूप उत्तम अभिनेते होते आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने ते किती उत्तम व्यक्तिमत्त्व होते याचा अनुभव घेतलाय. मला खरंच माहित नाही आता ते नसताना मी माझं आयुष्य कसं जगणार आहे. त्यांनी त्यांच्या आजाराचा अतिशय धीराने सामना केला. ते खूपच चांगली व्यक्ती होते आणि त्यांची खूप आठवण येईल. हा फोटो आम्ही तेव्हा काढला होता जेव्हा ख्रिसमसवेळी मी त्यांना हॉस्पिटलमधून घ्यायला आलो होतो. त्यावेळी त्यांचे हॉस्पिटलमधील तीन आठवडे अतिशय वाईट गेले होते पण तरीही तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहू शकता. चियानी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली."अशी पोस्ट बेन यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर त्यांच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

इयान यांनी गेम ऑफ थ्रोन्स सीरिजमध्ये साकारलेली केव्हन लॅनिस्टर ही भूमिका चांगलीच गाजली होती. या सीरिजच्या पाच सीजनमध्ये त्यांनी काम केलं होतं. याशिवाय बीबीसीच्या वन पिरियड डिटेक्टिव्ह सीरिजमध्येही या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी काम केलं होतं.

तसंच त्यांचे 'टॉर्चवूड','हिज डार्क मटेरियल्स','डॉक्टर व्हू','स्नॅच' आणि 'द बिल' हे सिनेमे खूप गाजले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT