Thoda Tuza Thoda Maza Cast: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या थोडं तुझ आणि थोडं माझं मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मानसी, तेजस आणि गायत्रीसोबत मालिकेतल्या इतर व्यक्तिरेखाही लक्षवेधी ठरत आहेत. लवकरच मालिकेत आणखी दोन पात्रांची एंट्री होणार आहे. दिवंगत अभिनेते निळु फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांची मालिकेत एण्ट्री होणार आहे. त्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रजनी सरपोतदार असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रजनी सरपोतदार खानदानी श्रीमंत आहे. पतीच्या निधनानंतर न खचता तिने खानदानी व्यवसायाचा डोलारा सांभाळला. तिचा स्वभाव अहंकारी आहे. रोहिणी अंधश्रद्धाळू आणि जरा जुन्या संकोचीत विचारांची आहे. मुहूर्त, शकुन, अपशकुन ह्यावर तिचा खूप विश्वास आहे. एकुलता एक मुलगा म्हणजेच रणजीतच्या बाबतीत ती खूपच पजेसिव्ह आहे. रणजीत आपल्या शब्दाबाहेर नाही याचा तिला अभिमान आहे. रणजीत प्रमाणेच आपल्या आज्ञेत राहणारी सूनच आपल्या घरी यावी असं तिला वाटतं.
तर मालिकेत रणजीतची भूमिका अभिनेता ओमप्रकाश शिंदे साकारत आहेत. हे पात्र शांत, सुस्वभावी, सरळमार्गी आहे. तोंडावर साखर आणि डोक्यावर बर्फ असा त्याचा स्वभाव आहे. तो आईच्या शब्दाबाहेर नाही. वडील गेल्यानंतर त्याने आपल्या आईला उत्तमरित्या आपला फॅमिली बिझनेस चालवताना पाहिलं आहे. तिलाच आदर्श मानून तो सुद्धा हुशारीने बिझनेस पुढे नेतोय. आत्तापर्यंत कोणताही निर्णय त्याने आईला विचारल्याशिवाय घेतला नाही. त्यामुळे स्वतः निर्णयक्षम नाही. म्हणून आता लग्नसुध्दा आई सांगेल त्या मुलीशी करुन संसार थाटायचा असं त्याने ठरवलं आहे.
दिसायला रुबाबदार आणि कायम हसतमुख असल्याने समोरच्या व्यक्तीला तो आपल्या मोहात पाडतो. अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या रणजीत आणि रजनीचा मानसी आणि तिच्या कुटुंबात कसा प्रवेश होणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे यापुढील भाग पाहायला विसरु नका रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.