gaurav more esakal
Premier

Mhada Lottery: 'फिल्टरपाड्याचा बच्चन'ला हवंय म्हाडाचं घर! 'या' कलाकारांनीही केलेत अर्ज

Payal Naik

म्हाडाच्या लॉटरीची सर्वसामान्य लोक वाट पाहत असतात. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देणं हे म्हाडाचं उद्दिष्ट असतं. इतरांप्रमाणे कलाकारही या घरासाठी अर्ज करत असतात. मात्र ते कलाकार कोट्यातून हे अर्ज करतात. आता अशाच काही घरांसाठी मराठी कलाकारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्या कलाकारांच्या नावाची यादी समोर आली आहे.

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' अशी ओळख असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे याने देखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे. ज्या पवईतील फिल्टरपाड्यात गौरव लहानाचा मोठा झाला त्याच पवईत त्याने उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज भरला आहे. गौरव मोरेप्रमाणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' म्हणून घराघरात पोहोचलेल्या निखिल बने याने पहाडी गोरेगाव आणि कन्नमवार नगर येथील घरांसाठी अर्ज भरले आहेत. देवमाणूस, तू चाल पुढं फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि पुन्हा कर्तव्य आहे फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर ह्या पहाडी गोरेगाव येथील घरासाठी इच्छुक आहेत.

किशोरी विज, सीमा देशमुख, निपुण धर्माधिकारी, गौतमी देशपांडे यांनी उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणत्या कलाकाराचे गृह स्वप्न साकार होईल हे येत्या ८ ऑक्टोबर रोजी कळणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी या घरांसाठी सोडत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु

Krushi Purskar 2024: चार वर्षे रखडलेले कृषी पुरस्कार विजेते शेतकरी मुंबई दाखल; पण सुविधांपासून वंचित; शासनाचा अजब कारभार

IDFC FIRST Bank: IDFC विलीनीकरण झाले पूर्ण; गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा, किती शेअर्स मिळणार?

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकलेंचा धुमाकूळ, अंकिताला सुनावले खडेबोल

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीत नऊ दिवस काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT