girija oak sakal
Premier

हसून बोलणाऱ्या महिलेकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं... गिरीजा ओकचं विधान चर्चेत, म्हणते- लगेच मैत्री केली म्हणजे

Girija Oak Interview: मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक हिने दिलेली एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Girija Oak: अभिनेत्री गिरीजा ओक हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली. ती मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही झळकली. चित्रपटांसोबत अनेक जाहिरातींमधून गिरीजा घराघरात पोहोचली. गिरीजा तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या बिनधास्त बोलण्यासाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नुकतीच तिने दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. हसून बोलणाऱ्या महिलेकडे उगीच वेगळ्या नजरेने बघितलं जातं असं गिरिजाने म्हटलं आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी देखील तिची बाजू घेतली आहे.

गिरिजाने नुकतीच आरपार या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना गिरीजा म्हणाली, 'वर्कस्पेसमध्ये चांगलं बोलणाऱ्या, हसून लगेच मैत्री करणाऱ्या महिलांकडे उगाचच एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. ही अव्हेलेबल असेल अशा नजरेने. तर मला असं वाटतं की आता आपण त्याच्या पलीकडे जायची गरज आहे. म्हणजे मी कुणाशीच बोलू नये, मी कुणाशीच नीट वागू नये असं माझ्यावर एक दबाव निर्माण व्हायला लागतो. तर त्याला दिशा दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे मला समोरच्यासोबत प्रेमानेपण राहायचंय पण त्याला कोणतीही हिंट देखील द्यायची नाहीये. पण त्याच वेळेला मी ही अशीच आहे.'

पुढे गिरीजा म्हणाली, 'मी अशाच मनमोकळ्या गप्पा मारणारी आणि प्रेमाने सगळ्यांशी बोलणारीच व्यक्ती आहे. कारण मला स्वतःला असं वाटत नाही की मी हातचं काही राखून कुणाशी तरी वागते. तर मी ही अशी वागले की अनेकांना वाटतं की अच्छा ही तर एकदम गप्पा वगरे मारते यार, कुठल्याही विषयाबद्दल बोलायला लागते. याचे अनेक अनुभव येतात. त्यामुळे मग मी हळूहळू बोलणं बंद करते किंवा कोषात जाते. जेवढ्यास तेवढं वागते, मला असं वाटतं की मला ते नाही करायचं. तर यापलीकडे यावं लोकांनी असं मला वाटतं. पुरुषांनी आणि स्त्रियांनीसुद्धा. जेव्हा तुम्ही एकत्र खूप दिवस काम करत असता तेव्हा तुम्हाला समोरच्यासोबत प्रेमानेच बोलावं लागतं. नाहीतर त्याचा कामावर परिणाम होतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT