हिरामंडी फेम अभिनेत्रीनं सांगितली धक्कादायक घटना
Sanjeeda Shaikh sakal
Premier

Heeramandi Actress: "त्या मुलीनं माझ्या छातीला स्पर्श केला अन्..."; हिरामंडी फेम अभिनेत्रीनं सांगितली धक्कादायक घटना

priyanka kulkarni

Sanjeeda Shaikh: 'हिरामंडी' (Heeramandi) या वेब सीरिजमुळे अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संजीदाने संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये वहिदा ही भूमिका साकारली आहे. हिरामंडी वेब सीरिजमधील संजीदा शेखच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता संजीदानं एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभनाबद्दल सांगितलं आहे.

संजीदानं सांगितला नाईट क्लबमधील अनुभव

संजीदा शेख हिने नाईट क्लबमध्ये असताना तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना शेअर केली आहे. तिने एका नवीन मुलाखतीत खुलासा केला आहे की तिला एका महिलेने चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता.

सजीदानं मुलाखतीत सांगितलं, "मला एक घटना अस्पष्टपणे आठवते. ही घटना एका मुलीबद्दल होती. मी नाईट क्लबमध्ये होतो. एक मुलगी तिथून जात होती. तिने फक्त माझ्या छातीला स्पर्श केला आणि ती निघून गेली.तेव्हा मी थक्क झालो होतो. एकाद्या पुरुषानं महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या घटना आपण ऐकतो पण,मुली देखील यामध्ये कमी नाहीयेत."

सजीदा म्हणाली, "विक्टिम कार्ड खेळणे फारच चुकीचे"

"जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागत असाल, तर तुम्ही स्त्री किंवा पुरुष आहात, हे महत्वाचे नसते. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. जर एखादी महिला तुमच्यासोबत चुकीची वागत असेल तर तिला ते सांगा. कारण मला वाटते विक्टिम कार्ड खेळणे फारच चुकीचे आहे.", असंही सजीदानं मुलाखतीत सांगितलं.

संजीदा शेख ही 2020 मध्ये पती आमिर अलीपासून विभक्त झाली. संजीदा अनेकवेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Closed: सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर निघाला! ईडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींनाच १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमाफी

CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

Russia-Ukraine War: रशियाने कीवमध्ये मुलांच्या रुग्णालयावर डागलं क्षेपणास्त्र, 24 जणांचा मृत्यू; अनेक मृतदेह गाडले, बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT