hema malini devanand  esakal
Premier

...आणि हेमा मालिनी व देव आनंद रोपवेवरच लटकले! हेमा मालिनीचा आजार अन् गाण्याचं शूटिंग, वाचा तो किस्सा

Payal Naik

लेखक- धनंजय कुलकर्णी

अभिनेत्री हेमा मालिनीला लहानपणापासून ‘ॲक्रोफोबिया’चा त्रास होता. ॲक्रोफोबिया म्हणजे उंचीवरून खाली पाहण्याची भीती. अशा लोकांना उंच इमारतीतून, पर्वतावरून खाली पाहताना खूप भीती वाटते. पोटात भीतीचा गोळा येतो. हा अतिशय कॉमन आजार आहे. याच फोबियाचा त्रास हेमा मालिनीला एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेला प्रचंड झाला होता. त्या वेळेला एक घटना घडली. अनपेक्षितपणे एक मोठा जर्क बसला आणि रोपवे मध्येच थांबली! खाली प्रचंड मोठी दरी होती आणि एका वायरला एका ट्रॉलीवर हेमा आणि देव आनंद लटकलेले होते.

‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट गोल्डी विजय आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात देव आनंद व हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. १९७० मध्ये प्रदर्शित झालेला ‘जॉनी मेरा नाम’ चित्रपट लोकप्रिय ठरला होता. चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हा किस्सा घडला होता. गोल्डी विजय आनंद त्याच्या चित्रपटातील गाण्यांच्या चित्रीकरणासाठी अतिशय लोकप्रिय होता. गाण्यातील प्रत्येक फ्रेम कशी अप्रतिम होईल याकडे त्याचा कल असायचा. चित्रपटातील या गाण्याच्या सिच्युएशनमध्ये हेमा मालिनी पोलिसांचा ससेमिरा चुकवत असते आणि ती देव आनंद सोबत खोटे खोटे प्रेमाचे नाटक करत असते. इन्स्पेक्टर जगदीश राज आणि त्याची टीम त्यांच्या मागावर असते. हे गाणं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलं होतं आणि त्याला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं होतं.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं विजय आनंदच्या पिक्चरायजेशनमुळे आजदेखील लोकप्रिय आहे. रसिकांच्या गाणे लक्षात आलेच असेल ‘वादा तो निभाया ओ मेरे राजा...’ या गाण्याचे चित्रीकरण बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नालंदा विश्वविद्यालय परिसरात केले होते. तिथेच या गाण्याचे बव्हंशी शूट झाले होते. या गाण्याचा एक अंतरा नालंदा जवळच्या राजगीर या बुद्ध मंदिर असलेल्या परिसरात झाले होते. या मंदिरात जाण्यासाठी त्या वेळी एक रोपवे होता. या रोपवेला एक ट्रॉली लटकवलेली होती आणि त्याद्वारे लोक त्या मंदिरापर्यंत पोहोचत होते. विजय आनंदला या गाण्यातील एक अंतरा या रोपवेवर चित्रित करायचा होता.

हेमा मालिनीने त्याला प्रचंड विरोध केला. कारण, तिथला माहोल पाहून तिचे डोळेच फिरले. भीतीने ती गांगरून गेली. कारण, एका रोपवेला लटकवलेल्या ट्रॉलीमधून वर जायचे तिला धडकी भरवणारे होते, परंतु गोल्डी आणि त्याच्या युनिटमधील लोकांनी तिला हिंमत दिली. देव आनंद यांनीदेखील तिला धीर दिला. ही ट्रॉली अतिशय छोटी होती. दोघेदेखील एका फ्रेममध्ये यावेत म्हणून देव आनंदच्या मांडीवर हेमा मालिनीला बसवले होते. तिने हाताने रोपवेच्या वरची वायर पकडली होती. गाण्याचे शूटिंग सुरू झाले. हेमा मालिनी प्रचंड घाबरली होती. तिच्या काळजाची धडधड वाढली होती. तिचा भीतीचा आजार बळावला होता. देव तिला धाडस देत होता. रोपवे जसजशी वर जाऊ राहिली, तसतशी हेमा मालिनीचे टेन्शन वाढू लागले.

विजय आनंद कॅमेरामध्ये तिचे टेन्शन येणार नाही, असे शूट करत होता, पण हेमा जाम घाबरली होती. त्याच वेळेला एक घटना घडली. अनपेक्षितपणे एक मोठा जर्क बसला आणि रोपवेमध्येच थांबली! खाली प्रचंड मोठी दरी होती आणि एका वायरला एका ट्रॉलीवर हेमा आणि देव आनंद लटकलेले होते. आता मात्र हेमा अक्षरशः रडायला लागली. भीतीने तिची गाळण उडाली. ती पूर्ण घामेजली होती. पल्सरेट प्रचंड वाढला होता. घशाला कोरड पडली होती. देव आनंदने त्याही काळात तिला धीर दिला तिचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि लवकरच रोपवे चालू होईल याची जाणीव करून दिली आणि काही काळजी करू नको मी आहे मला घट्ट धर, असं सांगितलं, पण हेमाचे टेन्शन वाढतच होते.

देव आनंदने तिचा मूड हलका करण्यासाठी काही जोक सांगायला सुरुवात केली, पण हेमा काही केल्या सावरायला तयार नव्हती. तिला आता चक्कर येऊ लागली होती. तितक्यात ती रोपवे पुन्हा सुरू झाली आणि हेमा सुखरूपपणे वरच्या टोकाला पोहोचली. तिच्या पायातील त्राण गेले होते. भीतीने तिची बोबडी वळाली होती. देव आनंद मात्र मस्त हसत होता. हळूहळू तिच्या मनातील टेन्शन कमी झाले. त्यानंतर विजय आनंदने काही शॉट्स क्लोजअपमध्ये घेतले आणि लॉन्ग शॉट आणि क्लोजअप शॉट्स यांचे कॉम्बिनेशन करून शूटिंग संपवले!

हा किस्सा हेमा मालिनीने तिच्या आत्मचरित्रामध्ये लिहिला आहे. त्यात ती सांगते, ‘आजदेखील ज्या ज्या वेळेला मी हा चित्रपट आणि हे गाणे पाहते, त्या वेळी तो भयानक प्रसंग आठवतो. मी प्रचंड नर्वस झालेली असते आणि तो प्रसंग आठवून आजसुद्धा माझी घाबरगुंडी उडालेली असते!’ उद्या १६ ऑक्टोबर हेमामालिनी यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने एक वेगळा किस्सा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

Savner Assembly Elections 2024: रामटेक वगळता ग्रामीणमधून ‘लिफाफे' बंद; भाजपाचा नवा पॅटर्न !

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

Latest Maharashtra News Updates : मविआची १७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद; जागा वाटप जाहीर होणार

SCROLL FOR NEXT